मायावतींचे चरणस्पर्श करणारा फोटो महागात पडला

By Admin | Updated: January 14, 2016 00:15 IST2016-01-14T00:15:09+5:302016-01-14T00:15:09+5:30

बसपाने पक्षप्रमुख मायावती यांच्या पाया पडणाऱ्या एका नेत्याचे तिकीट कापले आहे. संगीता चौधरी असे या नेत्याचे नाव आहे. २०१७ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बसपाने

The photo of Mayawati fell under the shadow of the photo | मायावतींचे चरणस्पर्श करणारा फोटो महागात पडला

मायावतींचे चरणस्पर्श करणारा फोटो महागात पडला

अलीगड : बसपाने पक्षप्रमुख मायावती यांच्या पाया पडणाऱ्या एका नेत्याचे तिकीट कापले आहे. संगीता चौधरी असे या नेत्याचे नाव आहे. २०१७ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बसपाने चौधरी यांना अंत्रौली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु चौधरी यांनी त्या स्वत: आणि त्यांची मुले मायावती यांच्या पाया पडत असल्याचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आणि त्यानंतर लगेच पक्षाने त्यांना दिलेले तिकीट कापले.
हे छायाचित्र फेसबुकवर झळकल्यानंतर मायावती कमालीच्या उद्विग्न झाल्या आणि त्यानंतर चौधरींची उमेदवारी रद्द करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. पक्षशिस्त मोडल्यामुळे चौधरींची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे, असे बसपाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद आदित्य यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि उमेदवारी रद्द करण्यामागच्या कारणांचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. संगीता चौधरी यांचे पती धर्मेंद्र चौधरी हे याआधी अंत्रौलीमध्ये बसपाचे उमेदवार होते. परंतु जानेवारी २०१५ मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या जागी संगीता यांना बसपाची उमेदवारी देण्यात आली होती.

Web Title: The photo of Mayawati fell under the shadow of the photo