शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत हजारो उतरले रस्त्यावर?; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 22:43 IST

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातल्या बहुतांश भागांमधील वातावरण पेटलं आहे. ईशान्य भारतामधील अनेक राज्यांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलनं करत आहेत. त्याचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे ईशान्य भारतात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एकीकडे ईशान्य भारतामधील स्थिती बिघडली असताना दुसरीकडे मुंबईतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत भव्य मोर्चा, हजारो नागरिक आंदोलनात सहभागी अशा मजकूरासह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण मुंबईपर्यंत पसरल्याचा संदेश यातून पोहोचवला जात आहे. यामध्ये एका पुलाखाली हजारोंची गर्दी दिसत आहे. मात्र हा फोटो मुंबईतील नसल्याचं पडताळणीतून दिसून आलं. महिन्याभरापूर्वी बांगलादेशमध्ये हा फोटो टिपण्यात आला आहे. हैदराबाद स्टार न्यूज 72 नावाच्या फेसबुक पेजवरुन हजारोंच्या गर्दीचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या पेजला १.६ लाख लोक फॉलो करतात. आतापर्यंत हा फोटो ३० हजार लोकांनी शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोची सत्यता पडताळून पाहत असताना युट्यूबवर एक व्हिडीओ सापडला. त्यामध्ये फोटोत दिसणारं ठिकाण अगदी स्पष्ट दिसत आहे. १० नोव्हेंबर २०१९ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. जश्न-ए-जुलूस या नावानं हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक