सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:23 IST2025-09-17T09:22:12+5:302025-09-17T09:23:19+5:30
या ट्रेंड्समुळे प्रायव्हसी व डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशात नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.

सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या फोटो एडिटिंगचे दोन नवे ट्रेंड्स वेगाने लोकप्रिय होत आहेत - गूगल नॅनो बनाना व विंटेज साडी एआय एडिट्स. साध्या सेल्फीला ३-डी कार्टूनसारखा लुक देणारा ‘नॅनो बनाना ट्रेंड’ आणि जुन्या काळातील पारंपरिक साडी, सिनेमाची पार्श्वभूमीसह दिलेला ‘विंटेज साडी लुक’ यामुळे वापरकर्त्यांचे फोटो नवे भासतात.
या ट्रेंड्समुळे प्रायव्हसी व डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशात नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
सिंथआयडी डिजिटल वॉटरमार्किंग
गूगलने आपल्या जेमिनी नॅनो मॉडेलमध्ये सिंथआयडी नावाचे डिजिटल वॉटरमार्किंग फीचर दिले आहे. हे वॉटरमार्क डोळ्यांना दिसत नाही, पण खास टूल्सच्या साहाय्याने फोटो एआयने तयार केला आहे की खरा आहे हे शोधता येते. तरीसुद्धा सर्वसामान्य वापरकर्त्याला हे समजणे कठीणच आहे.
माहितीचा गैरवापर होतोय?
तज्ज्ञांच्या मते, कोणतेही ॲप किंवा वेबसाइट वापरताना फोटो अपलोड केल्यास त्यात लोकेशन, डिव्हाइसचे नाव, वेळ यांसारखी माहितीही कंपन्यांकडे जाऊ शकते.
अधिकृत ॲप्स काही प्रमाणात सुरक्षित असले तरी बनावट ॲप्स किंवा वेबसाइट्स वापरल्यास माहितीचा गैरवापर होऊ शकतो.
फोटो कसे सुरक्षित ठेवाल?
वैयक्तिक फोटो, कुटुंबीयांची खासगी चित्रे किंवा मुलांची छायाचित्रे अपलोड करू नयेत.
फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यातील लोकेशन, वेळ आदी माहिती डिलीट करावी.
पोस्ट करताना प्रायव्हसी सेटिंग्स तपासून निवडक लोकांनाच पाहता येतील याची खात्री करावी.
प्लॅटफॉर्म तुमचे फोटो ट्रेनिंग डेटासाठी वापरणार नाहीत, याची अटी-शर्ती वाचाव्यात.
फोटो सार्वजनिक झाला की कोणीही डाऊनलोड करू शकतो.