शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:58 IST

फिलिपाइन्समधील मेरी आणि बुंदी येथील एका तरुणाची लव्हस्टोरी खूप चर्चेत आहे. बुं

प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. फिलिपाइन्सला राहणारी मेरी सातासमुद्रापार तिचं प्रेम शोधण्यासाठी राजस्थानच्या बुंदी येथे पोहोचली आहे. ही महिला गावातील तरुणाशी लग्न करण्यासाठी आली आहे, सध्या तिचे डॉक्युमेंट्स हे चेक केले जात आहेत. त्यानंतर परवानगी मिळताच ती लग्न करणार आहे.

फेसबुकवर सुरू झाली लव्हस्टोरी

फिलिपाइन्समधील मेरी आणि बुंदी येथील एका तरुणाची लव्हस्टोरी खूप चर्चेत आहे. बुंदी शहरातील शिव कॉलनीत किराणा दुकान चालवणाऱ्या मुकेश शर्माच्या प्रेमासाठी मेरी सर्व काही सोडून भारतात आली आणि नंतर ती राजस्थानच्या बुंदी येथे पोहोचली. मुकेश आणि मेरीची लव्हस्टोरी फेसबुकवरून सुरू झाली. 

बुंदीच्या शिव कॉलनीत किराणा दुकान चालवणाऱ्या मुकेश शर्माची १४ वर्षांपूर्वी फिलिपाइन्समध्ये राहणाऱ्या मेरीशी फेसबुकवर ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम फुललं. दोघंही रोज बोलू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने मेरी राजस्थानमध्ये आली.

मुकेशच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण

मेरी आपल्या घरी आलेली पाहून मुकेशला खूप आनंद झाला. परदेशी महिला सून होणार असल्याने मुकेशच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असून त्याच्या घरी अभिनंदनासाठी गर्दी होत आहे. तसेच मेरीला पाहण्यासाठी लोक घरी येत आहेत. मेरी येताच कॉलनीतील लोकांनी आपल्या भावी सुनेच्या स्वागताची पूर्ण तयारी केली आणि मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. 

कॉलनीतील लोक ढोल-ताशाच्या तालावर खूप नाचले. महिलांनी गाणी गायली आणि परिसरातील लोक आनंदाने उत्तेजित झालेले पाहून मेरीलाही नाचण्याचा मोह आवरला नाही. मेरी आणि मुकेश या दोघांनी सदर पोलीस ठाणे गाठून आवश्यक डॉक्युमेंट जमा केली. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमा शर्मा सांगतात की, आम्हालाही या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर आता महिलेचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासला जात असून जी काही कायदेशीर कारवाई आवश्यक असेल ती पूर्ण केली जाईल. 

टॅग्स :IndiaभारतRajasthanराजस्थानmarriageलग्न