शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Phethai Cyclone : आंध्र प्रदेशमध्ये 'फेथाई' चक्रीवादळाने हाहाकार, 11,000 जणांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:07 IST

'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे 'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. विशाखपट्टणममध्ये चक्रीवादळाने अनेक झाडे जमीनदोस्त झाली. विजयवाडा शहरात भूस्खलन झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला 11,000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

भुवनेश्वर - 'तितली' आणि 'गज' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये 'फेथाई चक्रीवादळ' निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेशमधील अनेक भागांना बसला आहे. विशाखपट्टणममध्ये चक्रीवादळाने अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर विजयवाडा शहरात भूस्खलन झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 11,000 लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगडमध्ये या चक्रीवादळामुळे 16 ते 19 डिसेंबरदरम्यान मुसळधार तर विदर्भात हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या भागात ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तसेच ओडिशाच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

'फेथाई' चक्रीवादळामुळे संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 22 रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त काही ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.  'फेथाई' चक्रीवादळाआधी तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळ तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर तितली चक्रीवादळ येऊन धडकले होते. या चक्रीवादळांदरम्यान प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. 

टॅग्स :Cyclone Phethaiफेथाई चक्रीवादळAndhra Pradeshआंध्र प्रदेशDeathमृत्यूOdishaओदिशा