शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत भाजप खासदार फांगनोन कोन्याक? ज्यांनी राहुल गांधींवर केलाय गैरवर्तनाचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:43 IST

Phangnon Konyak : या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे.

Phangnon Konyak :  नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेलं असताना आज संसदेच्या मकर गेटजवळ धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. काँग्रेसचे खासदार आणि भाजपचे खासदार समोरसमोर आले. यावेळी धक्काबुक्की झाली. या धक्काबु्क्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले. 

या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे. दरम्यान, या घटनेवेळी नागालँडच्या भाजप खासदार फांगनोन कोन्याक या सुद्धा उपस्थित होत्या. आंदोलनादरम्यान राहुल गांधी हे आपल्याजवळ आले आणि त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राहुल गांधींच्या वागण्याने मला अस्वस्थ वाटले, असा आरोप खासदार फांगनोन कोन्याक यांनी केला आहे. 

फांगनोन कोन्याक म्हणाल्या की, संसद परिसरात मकर गेटच्या पायऱ्यांखाली शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. यावेळी राहुल गांधी माझ्या जवळ आले. यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागले. ते माझ्यावर ओरडले. मी स्वतःचा बचाव करू शकलो नाही असे नाही. पण, त्यांच्या वागण्याने मी खूप नाराज झाले. कोणत्याही महिलेला, विशेषत: नागालँडमधून येणाऱ्या महिलेला अशी वागणूक देऊ नये. मला सभापतींचे संरक्षण हवे आहे.

दरम्यान, याप्रकरणी भाजप खासदार फांगनोन कोन्याक यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याकडे तक्रार केली. त्या म्हणाल्या, राहुल गांधींनी माझ्याशी गैरवर्तन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून मी काँग्रेसचा निषेध करत होते. त्यानंतर राहुल गांधी माझ्या अगदी जवळ आले. अचानक ते आरडाओरड करू लागले. आज जे काही घडले ते अतिशय दुःखद आहे. राहुल गांधी यांनी माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान दुखावला आहे. मी सभागृहात सुरक्षेची मागणी करते.

कोण आहेत फांगनोन कोन्याक?फांगनोन कोन्याक या नागालँडमधून राज्यसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला सदस्य आहेत. फांगनोन कोन्याक या नागालँडमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. मार्च 2022 मध्ये त्या नागालँडमधून राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यांचे शालेय शिक्षण दिमापूर येथील होली क्रॉस उच्च माध्यमिक विद्यालयातून झाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा