शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

तुमची कंपनी पीएफ खात्यात योग्य प्रकारे पैसे भरत नसल्यास काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 12:00 IST

66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली.

मुंबई- पगारदार लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी हा सेव्हींगचा अत्यंत चांगला पर्याय मानला जातो. 66 वर्षांपूर्वी एम्प्लॉइज प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजेच इपीएफओची निर्मिती करण्यात आली. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी ही योजना लागू करण्यात आली. संघटित आणि असंघटीत अशा सर्व क्षेत्रांसाठी ती लागू करण्यात आली. काही कंपन्यांनी स्वतःचे प्रॉव्हिडंट फंडही तयार केलेले आहेत. पगारदार लोकांसाठी करबचतीसाठीही इपीएफची मोठी मदत होते. या पैशांवर मिळालेले व्याज व परतावा यांच्यावर कोणताही कर लावला जात नाही. तसेच इपीएफमध्ये जमा केलेल्या पैशासाठी करनियम 80 सी खाली सूटही मिळते. मात्र स्वतःचे प्रॉव्हीडंट उंड चालवणाऱ्या 300 कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केले असून कर्मचाऱ्यांना योग्य व्याज देण्यात त्यांना यश आले नसल्याचे केंद्रीय श्रम मंत्रालयाने (लेबर मिनिस्ट्री) जाहीर केले आहे.आपली कंपनी निधीमध्ये योग्यप्रकारे पैसे जमा करत आहे की नाही हे पाहाण्यासाठी तुम्ही काय कराल?1) तुम्हाला मिळत असलेला पगार आणि त्यामध्ये कापून घेतले जाणारे पैसे हे दोन्ही आकडे नेहमी तपासत राहा.तसेच तुमची सॅलरी स्लिप आणि पीएफ खाते यावरही लक्ष ठेवा, अधूनमधून ते पीएफ खाते तपासत राहा.2) जर त्यामध्ये कोणतीही चूक किंवा गोंधळ दिसल्यास तात्काळ तुमच्या एचआर अथवा आर्थिक व्यवहार विभागाकडे जाऊन चौकशी करा.3) जर या विभागात योग्य प्रकारे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर कंपनीच्या व्यवस्थापनाकडे चौकशी करा किंवा पीएफ ट्रस्टकडे चौकशी करा.4) येथेही तुमचे समाधान झाले नाही तर प्रादेशिक निर्वाह निधी आयुक्त किंवा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.5) इपीएफओकडे ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधाही देण्यात आलेली असते. ही तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे युनिवर्सल अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. ज्या कंपन्यांचे स्वतःचे प्रॉव्हिडंट ट्रस्ट आहेत त्यांच्यासाठीही हा नंबर असणे आवश्यक आहे. तुमच्या तक्रारीवर तोडगा मिळण्यासाठी 30 दिवसांचा अवधी लागेल.6) शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही पोलिसांकडे भारतीय दंडविधान संहितेच्या नियम 405अन्वये फसवणूकीची तक्रार दाखल करु शकता. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEconomyअर्थव्यवस्थाInvestmentगुंतवणूकEmployeeकर्मचारी