शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी... वडील पेट्रोल पंपावर कामगार, मुलगी IIT तून पेट्रोलियम इंजिनिअर बनणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:49 IST

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी या मुलीच्या कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. तर, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनीही या मुलीच्या यशाच कौतुक करत ट्विटरवरुन बापलेकीचा फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनीही ट्विट करुन म्हटले की, काळजाल भिडणारी घटना आहे, आर्या राजगोपाल हिने तिच्या वडिलांना आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आम्हा सर्वांनाच सन्मानित केलं आहे

मुंबई - तुमच्याकडे काहीतरी करण्याची धडपड असल्यास पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवणं अवघड नाही. अनेकदा स्पर्धा परीक्षांच्या निकालातून आपण हे पाहिलंय. रिक्षावाल्याच्या मुलानं युपीएससी क्रॅक केली, बँडवाल्याचा लेक साहेब झाला, या बातम्या युथ इंडियाला प्रेरणा देतात. तर, युपीएससीत मुलींची बाजी हा मथळही मुलींच्या कर्तृत्वाची पताका फडकवत असतो. आता, उत्तर प्रदेशातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या बापाच्या लेकीने अशीच यशाची पताका फडकावली आहे. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष माधव वैद्य यांनी या मुलीच्या कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. तर, केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनीही या मुलीच्या यशाच कौतुक करत ट्विटरवरुन बापलेकीचा फोटो शेअर केला आहे. आर्या राजगोपल असं या मुलीचे नाव असून तिचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. आर्याने आता कानपूरच्या आयआयटीमध्ये पेट्रोलियम इंजिनिअरच्या पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे, सध्या ही बाप-लेकीची जोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनीही ट्विट करुन म्हटले की, काळजाल भिडणारी घटना आहे, आर्या राजगोपाल हिने तिच्या वडिलांना आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आम्हा सर्वांनाच सन्मानित केलं आहे. वडिल-मुलीची ही जोडी देशासाठी प्रेरणादायी असून रोल मॉडेल आहे. माझ्या शुभेच्छा... असे भावनिक ट्विट पुरी यांनी केले आहे.  इंडियन ऑईलचे चेअरमन श्रीकांत माधव यांनीही ट्विट केले आहे, आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करुन लिहिलं आहे की, मी इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजगोपाल यांच्या मुलीची प्रेरणादायी कथा मी शेअर करत आहे. आर्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळवून आमचा सन्मान केला आहे. आर्याला माझ्या शुभेच्छा... असे माधव यांनी ट्विटमध्ये लिहिले असून दोघांचाही फोटो शेअर केला आहे. 20 वर्षांपासून करतायंत पेट्रोल पंपावर काम

आर्या राजगोपाल हिचे वडिल गेल्या 20 वर्षांपासून पेट्रोल पंपावर काम करत आहेत. वडिलांचा त्याग आणि स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर आर्याने स्वत:ला सिद्ध करून आदर्श निर्माण केला आहे. आयआयटी कानपूर येथे आर्या पेट्रोलियम इंजिनिअरींगचे पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. यापूर्वी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून तिने पदवी प्राप्त केली आहे.  

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपKanpur IITकानपूर आयआयटीministerमंत्री