मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी पुरवठ्यासंदर्भात देशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यासंदर्भात खुद्द पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, देशात कच्च्या तेलाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, तसेच कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेली दोन दिवस अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. मात्र, या रांगा केवळ भीतीपोटी (Panic Buying) होत्या, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. एलपीजीच्या बाबतीत सरकारने २१ मार्च रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, व्यावसायिक (Commercial) एलपीजीचा कोटा २० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आतापर्यंत २६ राज्यांना सुमारे २२ हजार टन व्यावसायिक एलपीजी वितरित करण्यात आला असून धाबे, हॉटेल्स आणि औद्योगिक कॅन्टीनला प्राधान्य दिले जात आहे. घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नसून ९२ टक्के ऑनलाइन बुकिंग सुरू आहे.
२५ दिवसांत २.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन -सरकार आता ग्राहकांना पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. गेल्या २५ दिवसांत २.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून, २.२ लाख ग्राहकांनी एलपीजी सोडून पीएनजीचा पर्याय निवडला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया आणि मंजुरीची कालमर्यादा अधिक सुलभ करण्यात आली आहे. सीएनजीचा पुरवठाही पूर्ण क्षमतेने सुरू असून अनेक कंपन्या 500 रुपयांपर्यंत फ्री गॅस अथवा सिक्योरिटी डिपॉजिट माफ करण्यासारखे प्रोत्साहनही देत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता सामान्यपणे सिलिंडर बुकिंग करावे, असे आवाहनही सरकारकडून करण्यात येत आहे.
Web Summary : Government assures ample fuel supply despite Middle East tensions. No price hikes for petrol, diesel, LPG shortages ruled out. PNG connections are promoted.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बावजूद, सरकार ने ईंधन आपूर्ति का आश्वासन दिया। पेट्रोल, डीजल की कीमतों में कोई वृद्धि नहीं, एलपीजी की कमी नहीं होगी। पीएनजी कनेक्शन को बढ़ावा दिया जा रहा है।