शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मोदी सरकार 'टायमिंग' साधणार, सामान्यांच्या खिशात पुन्हा हात घालणार; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 2:01 PM

महिन्याच्या अखेरपर्यंत इंधनाचे दर वाढण्याची दाट शक्यता; पेट्रोल, डिझेल २ ते ३ रुपयांनी महागणार

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे देशातील सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आहे. देशातील काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं लॉकडाऊन लागू आहे. तर काही भागांत लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार संकटात आला आहे. अशा परिस्थितीत आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Hike) वाढू शकतात. तसं झाल्यास वाहतूक खर्च जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतील. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसेल.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्योग जगताला म्हणाल्या, 'Wait & Watch'...एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन कंपन्या दर वाढवणार असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं दिलं आहे. देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. पैकी ४ राज्यांमधील मतदान पार पडलं आहे. तर केवळ पश्चिम बंगालमधील दोन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. २९ एप्रिलला शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. त्यानंतर इंधन कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.बलसागर भारत होवो! भारतात आणखी ४ राफेल विमानं दाखल; पहिली स्क्वॉड्रन पूर्णएएनआयच्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमती २ ते ३ रुपयांनी वाढू शकतात. मात्र ही वाढ एकदाच होणार नाहीत. ती हळूहळू होईल. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत इंधनाची मागणी घसरली आहे. सध्या खनिज तेलाच्या एका बॅरलची किंमत ६६ डॉलर इतकी आहे.पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये २७ फेब्रुवारीपासून वाढ झालेली नाही. त्यानंतर मार्च, एप्रिल महिन्यात इंधनाच्या दरात चारवेळा कपात झाली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ पैशांनी, तर डिझेलचे दर ७४ पैशांनी कमी झाले. दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९०.४० रुपये, तर डिझेलचा दर ८०.७३ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ९६.८३ रुपये, तर डिझेलचा दर ८७.८१ रुपये इतका आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल