शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

केंद्र जुमानेना! या राज्याने पेट्रोल 2.20 रुपयांनी अन् डिझेल 57 पैशांनी केले स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 12:38 IST

Petrol Diesel Price Hike: गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालसह काही राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. यामुळे अन्य राज्यांवर इंधनाचे दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे. परंतू केंद्र सरकार कमी करत नाही तर आम्ही का करायचे यावर ही राज्ये अडून बसली आहेत.

देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरांनी (Petrol Diesel Price Hike) सामान्यांच्या खिशाला आग लावली आहे. गेले दोन दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली नव्हती, मात्र आज पुन्हा 35 पैशांची वाढ झाल्याने पेट्रोलचे दर वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दरवाढीला युपीए सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. तर अर्थमंत्र्यांनी परिस्थिती गंभीर असून केंद्र आणि राज्याने चर्चा करून दर कमी करावेत असे म्हटले होते. (Amid the rise of fuel prices in the country, the Nagaland government on Monday cut down taxes on petrol, diesel and other motor spirits.)

 गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालसह काही राज्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. मात्र, हे एक नाहीतर दोन रुपये एवढेच कमी केले होते. यामुळे अन्य राज्यांवर इंधनाचे दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे. परंतू केंद्र सरकार कमी करत नाही तर आम्ही का करायचे यावर ही राज्ये अडून बसली आहेत. दुसरीकडे नागालँडसारख्या छोट्या राज्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करत जनतेसाठी करोडोंच्या महसुलावर पाणी सोडले आहे. 

नागालँड सरकारने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील कर  29.80% वरून कमी करून 25% प्रति लीटर किंवा किंमत 18.26 रुपयांनी घटवून 16.04 रुपये प्रती लीटर जे अधिक असेल ते, केले आहे. यामुळे पेट्रोल जास्तीत जास्त 18.26 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या करात 17.50% वरून 16.50 % प्रति लीटर किंवा 11.08 रुपयांवरून घटवून 10.51 रुपये प्रति लीटर जो अधिक असेल तो केला आहे. यामुळे 22 फेब्रुवारीच्या रात्रीपासून नालालँडमध्ये पेट्रोल 2.20 रुपयांनी अन् डिझेल 57 पैशांनी स्वस्त झाले आहे. 

तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. 

मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 97.34 रुपये आहे. एकंदरीतच मेट्रो शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 91.12 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलची 84.24 रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. मुंबईत डिझेलचे दर 88.44 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दरनवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 90.93 रुपये प्रति लिटरमुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.34 रुपये प्रति लिटरकोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.1 2रुपये प्रति लिटरचेन्नई (Chennai Petrol Price Today) : 92. 90 रुपये प्रति लिटरनोएडा (Noida Petrol Price Today) : 89.19 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे दरनवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.32 रुपये प्रति लिटरमुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.44 रुपये प्रति लिटरकोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.20 रुपये प्रति लिटरचेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.31 रुपये प्रति लिटरनोएडा (Noida Diesel Price Today) : 81.76 रुपये प्रति लिटर 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदी