पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 02:02 IST2021-05-06T02:01:36+5:302021-05-06T02:02:00+5:30
या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये लिटर आणि डिझेल ८१.१२ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९७.१२ रुपये लिटर, तर डिझेल ८८.१९ रुपये लिटर झाले

पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी पुन्हा वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर १९ पैशांनी, तर डिझेलचे दर २१ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.
या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.७४ रुपये लिटर आणि डिझेल ८१.१२ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल ९७.१२ रुपये लिटर, तर डिझेल ८८.१९ रुपये लिटर झाले. ही दरवाढ देशभरात लागू झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोखून धरली होती.