शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठीच पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीचे सत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:53 IST

डिसेंबरपासून पुन्हा वाढण्याची शक्यता

मुंबई : तेल कंपन्यांकडून जुलैपासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ आॅक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात अचानक थांबवून आता कपात सुरूआहे. पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच तेल कंपन्यांनी दरकपात सुरू केली असल्याचे दिसत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरपासून पुन्हा दर भडकण्याची भीती आहे.इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले. रुपयासुद्धा डॉलरसमोर कमकुवत आहे. यामुळेच सप्टेंबर महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकावर गेले. केंद्र व राज्य सरकारांनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही इंधनावरील करांमध्ये कपात केली. त्यानंतर, चारच दिवसांनी ६ आॅक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी १८ आॅक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवूनदरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.सध्याची स्थिती सप्टेंबरसारखीचडॉलरचा दर व कच्च्या तेलाचे भाव या दोन्ही घटकांची स्थिती सध्या सप्टेंबरसारखीच आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण सेलच्या मते, सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाचा सरासरी दर ७७.५० डॉलर प्रति बॅरल (१५९ लीटर) होता. त्या महिन्यात एका डॉलरचा दर ७२.०२ रुपये होता. आता कच्चे तेल जेमतेम कमी होऊन ७६.५१ डॉलर प्रति बॅरल झाले आहे, पण डॉलर ७३.४२ रुपयांपर्यंत वधारला आहे.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढElectionनिवडणूकPetrolपेट्रोलDieselडिझेल