दिल्लीत पीयूसीशिवाय मिळणार नाही पेट्रोल
By Admin | Updated: August 23, 2014 01:50 IST2014-08-23T01:50:49+5:302014-08-23T01:50:49+5:30
दिल्लीत मोटारचालकांना लवकरच पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पीयूसी प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

दिल्लीत पीयूसीशिवाय मिळणार नाही पेट्रोल
नवी दिल्ली : दिल्लीत मोटारचालकांना लवकरच पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पीयूसी प्रमाणपत्र दाखवावे लागेल. दिल्ली सरकारने हा निर्णय वाहनांमुळे होणा:या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बुधवारी तत्त्वत: घेतला आहे.
मुख्य सचिव एस. के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च पातळीवरील बैठकीत वाहनांमुळे होणा:या प्रदूषणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
वाहनांमुळे होणा:या प्रदूषणाला रोखण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने प्रदूषण नियंत्रणात आहे (पोल्युशन अंडर कंट्रोल-पीयूसी) असे प्रमाणपत्र वाहनचालकाला पेट्रोलपंपावर दाखविण्याची सक्ती करावी, अशी शिफारस केली होती. ती स्वीकारण्यात आली आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दोन महिने लागतील, असे सांगून श्रीवास्तव म्हणाले, ‘‘प्रारंभी दिल्ली सरकार प्रदूषणाच्या विषयावर नागरिक व अन्य संबंधितांमध्ये जागृती करणार आहे त्यामुळे नागरिक नियमांचे स्वेच्छेने पालन करतील.’’ वेगवेगळ्या पेट्रोलपंपांवर वाहनांमधील प्रदूषणाची पातळी तपासून पीयूसी प्रमाणपत्र मिळण्याची सोय सध्याही उपलब्ध आहे. शिवाय, आवश्यक ती व्यवस्थाही केली जाईल,’’ असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4पीयूसी प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय मोटारचालकांना यापुढे पेट्रोल द्यायचे नाही, असे आदेश प्रशासनाने पेट्रोलपंपचालकांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी पार्किग शुल्कात मोठी वाढ आणि रस्ते करांमध्ये वाढ करण्याची शिफारस या तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी केली होती.