शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पेट्रोल अन् डिझेल लवकरच शंभरी गाठणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 06:27 IST

दिल्लीमध्ये आता पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर असे झाले. गेल्या १९ दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये एकूण ८.६६ रुपयांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: इंधनाची सतत होणारी दरवाढ पाहता देशातील पेट्रोल, डिझेलचे दर लवकरच शंभरपर्यंत जातील,  अशी भीती व्यक्त होत आहे. दरवाढीमुळे मालवाहतूकही महागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच ठेवल्याने राजधानीत डिझेलची किंमत प्रथमच ८० रुपयांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी आणि गुरुवारीही दरवाढ करण्यात आल्याने डिझेलचे दर एका लिटरला १०.६३ रुपयांनी वाढले होते. पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये डिझेलचे दर लिटरला १४ पैशांनी वाढून ८०.०२ रुपये असे झाले होते. प्रथमच डिझेलच्या दराने ८० रुपयांची पातळी ओलांडलेली दिसून आली. गेल्या १९ दिवसांत डिझेल १०.६३ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या दरामध्येही इंधन कंपन्यांनी लिटरमागे १६ पैशांची वाढ केली होती. यामुळे दिल्लीमध्ये आता पेट्रोलचे दर ७९.९२ रुपये प्रति लिटर असे झाले. गेल्या १९ दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये एकूण ८.६६ रुपयांनी वाढ झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून अबकारी कर तसेच व्हॅट यांची आकारणी केली जाते. त्यामुळे इंधनाच्या जाहीर झालेल्या दरांपेक्षा प्रत्येक राज्यामध्ये अधिक रक्कम ग्राहकांना मोजावी लागते. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीखाली आणण्याची मागणी केली जात असली तरी अनेक राज्यांचा त्याला विरोध आहे.>दिल्ली : पेट्रोलचे दर ८० रुपयांची पातळी ओलांडून पुढे गेले. सलग २० व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.>मुंबई: मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८६.९१ रुपये आणि ७८.५१ रुपये प्रति लिटर आहेत. आधी कंपन्या ५ ते १० पैशांची दरवाढ करीत. मात्र अनलॉकनंतर पेट्रोल व डिझेल १0 रुपयांनी महागले.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल