पेट्रोल, डिझेलच्या दरामधील वाढ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 23:10 IST2020-06-15T23:09:55+5:302020-06-15T23:10:15+5:30
८२ दिवसांनंतर ७ जूनपासून कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज जाहीर करण्यास प्रारंभ केला

पेट्रोल, डिझेलच्या दरामधील वाढ सुरूच
नवी दिल्ली : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग नवव्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलचे दर लिटरमागे ४८ पैशांनी, तर डिझेलच्या दरात २३ पैशांनी वाढ झाली आहे.
देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर इंधन कंपन्यांनी दररोज होत असलेला दरातील बदल थांबविला होता. त्यानंतर ८२ दिवसांनंतर ७ जूनपासून कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज जाहीर करण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे.
गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलचे दर लिटरला ४.८७ रुपये इतके वाढले आहेत. या दरांशिवाय प्रत्येक राज्याचा व्हॅट हा इंधनावर आकारला जात असतो. त्यामुळे या वाढीपेक्षा अधिक झळ ग्राहकांना बसत असते.