शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंगप्रकरणी चौकशीच्या याचिकांवर सर्वोच्च सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 05:15 IST

सुप्रीम कोर्ट घेणार १३ सप्टेंबर रोजी सुनावणी

ठळक मुद्देसरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. सूर्य कांत आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या न्यायपीठाने १७ ऑगस्ट रोजी या याचिकांवरून केंद्र सरकारला नोटीस जारी केली होती.

नवी दिल्ली : इस्रालयच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करून भारतातील काही ठरावीक लोकांवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आल्याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी १३ सप्टेंबर रोजी घेेण्याचे निश्चित करून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास आणखी वेळ दिला.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. सूर्य कांत आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या न्यायपीठाने १७ ऑगस्ट रोजी या याचिकांवरून केंद्र सरकारला नोटीस जारी केली होती. त्यावेळी न्यायापीठाने स्पष्ट केले होते की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती सरकारला उघड करण्याची गरज नाही. हे प्रकरण मंगळवारी सुनावणीसाठी आले असता केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की, याप्रकरणात दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासंबंधी निर्णय घेण्यासंदर्भात मी संबंधित अधिकाऱ्याना भेटू शकलो नाही. तेव्हा याचिका येत्या गुरुवारी किंवा पुढील सोमवारी सूचीबद्ध करण्याची विनंती त्यांनी केली.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या याचिकेसह १२ याचिकांमार्फत याप्रकरणी न्यायालयाला स्वतंत्रपणे चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे.याप्रकरणी दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. काही अडचणीमुळे याबाबत आतापर्यंत निर्णय घेता आला नाही. तेव्हा त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत वेळ द्यावा, अशी विनंती मेहता यांनी न्यायालयाला केली. पत्रकार एन. राम यांच्यावतीने वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सांगितले की, मेहता यांच्या विनंतीला माझा आक्षेप नाही. त्यानंतर १३ सप्टेंबरला सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी