ँपान-२ सभापतींविरुध्दची याचिका हायकोर्टानेही फेटाळली

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:02+5:302014-12-23T00:04:02+5:30

सभापतींविरुद्धची याचिका

The petition against the UPA-II chairperson also rejected the high court | ँपान-२ सभापतींविरुध्दची याचिका हायकोर्टानेही फेटाळली

ँपान-२ सभापतींविरुध्दची याचिका हायकोर्टानेही फेटाळली

ापतींविरुद्धची याचिका
हायकोर्टानेही फेटाळली
पणजी : सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्याविरुध्द कथित बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्याचा खास न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उचलून धरला असून याचिकादार आयरिश रॉड्रिग्स यांनी आता सवार्ेच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालवली आहे.

मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व न्यायमूर्ती एफ. एम. रेइश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आयरिश यांची आव्हान याचिका सुनावणीस आली. सभापतींविरुध्द गुन्हा नोंदविण्यास परवानगी नसल्याने ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचे खास न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी म्हटले होते. उच्च न्यायालयाने हा आदेश उचलून धरला आणि आयरिश यांची याचिका फेटाळली.
आर्लेकर यांनी पर्वरी येथे ७२ लाख रुपये खर्चून ५00 चौरस मीटर भूखंड खरेदी केलेला आहे आणि त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा हा खर्च कितीतरी पटीने अधिक असल्याचे आयरिश यांचे म्हणणे आहे. या ७२ लाख रुपयांव्यतिरिक्त आर्लेकर यांनी मुद्रांक शुल्काचे २ लाख ५२ हजार रुपये तसेच नोंदणी व प्रक्रिया शुल्काचे २ लाख १६ हजार रुपये भरल्याचे आयरिश यांचे म्हणणे आहे. ९ फेब्रुवारी २0१२ रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या उत्पन्नाच्या माहितीत आर्लेकर यांनी स्वत:चे आणि शिक्षिका असलेल्या पत्नीचे जे उत्पन्न दाखवले आहे, त्यातून एवढ्या मोठ्या रकमेची मालमत्ता खरेदी करणे शक्य नसल्याचा आयरिश यांचा दावा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The petition against the UPA-II chairperson also rejected the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.