विकृत ! कुत्र्यासोबत सेक्स करणा-याला अटक

By Admin | Updated: October 25, 2016 09:48 IST2016-10-25T09:45:32+5:302016-10-25T09:48:26+5:30

कुत्र्यासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याप्रकरणी एका 22 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Pervert! Stuck to a sexually transmitted dog | विकृत ! कुत्र्यासोबत सेक्स करणा-याला अटक

विकृत ! कुत्र्यासोबत सेक्स करणा-याला अटक

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 25 - कुत्र्यासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याच्या संशयावरुन एका 22 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अस्लम खान असे आहे. ज्या कुत्र्यासोबत अस्लमने पाशवी कृत्य केले तो कुत्रा पोलिसांना घटनास्थळी मृतावस्थेत आढळला.
 
झाडाझुडपांमध्ये अस्लम या कुत्र्यासोबत पाशवी कृत्य असताना तेथील स्थानिकांनी पाहिले, त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली. यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या कुत्र्याला अस्लमने गळा दाबून मारले आहे की त्याच्यासोबत अनैसर्गिक सेक्स करत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, अस्लम खान हा मानसिक रुग्ण दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
अशा पद्धतीच्या घटना या मानवी स्वभावाची हिंसक वृत्ती उघड करणा-या आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी अशा गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्राणीमित्रांकडून केली जात आहे. याआधीही चेन्नईमध्येही मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी एका कुत्र्याला इमारतीवरुन खाली फेकले होते, आणि याचा व्हिडीओ काढला होता. सुदैवाने, प्राणीमित्रांमुळे हा कुत्रा या घटनेतून वाचला. 
 

Web Title: Pervert! Stuck to a sexually transmitted dog