विकृत ! मोबाईल चोरीच्या संशयावरुन गुप्तांगात पेट्रोल टाकून मारहाण
By Admin | Updated: October 21, 2016 12:49 IST2016-10-21T12:49:56+5:302016-10-21T12:49:56+5:30
मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन चौघांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करताना त्यांच्या गुप्तांगात पेट्रोल टाकण्यात आलं होतं.

विकृत ! मोबाईल चोरीच्या संशयावरुन गुप्तांगात पेट्रोल टाकून मारहाण
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन चौघांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करताना त्यांच्या गुप्तांगात पेट्रोल टाकण्यात आलं होतं. मारहाण करण्यात आलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. गाजियाबादमध्ये ही विकृत घटना घडली आहे. आरोपींमध्ये समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्याचा भाऊ रिजवान असून त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
रिजवानची डेअरी असून शेजारी राहणा-या चौघांनी आपला मोबाईल चोरल्याचा त्याला संशय होता. त्याने चौघांना आपल्या डेअरीवर बोलावून घेतलं होतं. झहीर बेग, गुलजार, फिरोज आणि फिमो या चौघांना यावेळी बेदम मारहाण करत आली. रिजवानसोबत त्याचे मित्र अकिल आणि नदीमदेखील होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींनी रिजवानच्या बाईकमधील पेट्रोल काढून आणलं आणि इंजेक्शनमध्ये भरुन चौघांच्या गुप्तांगामध्ये टाकलं. पीडित तरुण मदतीसाठी ओरडत होते, शेवटी त्यांची शुद्द हरपली. यामधील दौघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर सर्जरी करावी लागणार आहे. पोलिसांनी रिजवान आणि अकिलला अटक केली असून नदीम फरार आहे.