शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:43 IST

निमलष्करी दलाला आता हवाई मार्गानं ये-जा करता येणार

नवी दिल्ली: पुलवामासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदी सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी निमलष्करी दलाचे जवान आता हवाई मार्गाचा वापर करु शकतात. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू या दरम्यान निमलष्करी दलाचे जवान हवाई मार्गानं प्रवास करु शकतात. केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या जवानांसाठीही हा आदेश लागू असेल.गृह मंत्रालयाच्या आदेशाचा फायदा निमलष्करी दलाच्या 7 लाख 80 हजार जनानांना होईल. यामध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआईपासून सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करता येत नव्हता. पुलवामात ज्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला, त्यात सीआरपीएफचे तब्बल अडीच हजार जवान होते. इतके जवान एकाचवेळी का प्रवास करत होते, असा प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित झाला. या जवानांना हवाई मार्गानं श्रीनगरला पाठवण्यात आलं असतं, तर हल्ला टाळता आला असता, अशी चर्चादेखील त्यावेळी झाली. त्यामुळे आता सरकारनं निमलष्करी दलाच्या जवानांना हवाई मार्गानं प्रवास करण्याचे अधिकार दिले आहेत. आठवड्याभरापूर्वी पुलवामात सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं ताफ्यातील एका बसला जोरदार धडक दिल्यानं मोठी दुर्घटना घडली. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अडीच हजार जवानांचा ताफा श्रीनगरला जात होता. इतक्या मोठ्या संख्येनं जवान रस्त्यानं प्रवास करणार असल्यानं सुरक्षेचा मुद्दा होता. त्यामुळे त्यांना हवाई मार्गानं नेण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र गृह मंत्रालयानं ती दिली नाही, असं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्टीकरण गृह मंत्रालयानं दिलं होतं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद