नवविवाहितेचा छळ ; पतींसह दोघांवर गुन्हा

By Admin | Updated: December 30, 2016 23:06 IST2016-12-30T23:06:24+5:302016-12-30T23:06:24+5:30

कोल्हापूर : चारचाकी वाहन व कोल्हापुरात फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद विणा संदीप रजपूत (वय २७, सध्या राहणार नारायणसिंग रामसिंग रजपूत, बॉम्बे चाळीशेजारी, लक्ष्मी एक्स्टेंशन गोकाक जि. बेळगांव) यांनी दिली.

Persecution of a New Wife; The crime of both with husband | नवविवाहितेचा छळ ; पतींसह दोघांवर गुन्हा

नवविवाहितेचा छळ ; पतींसह दोघांवर गुन्हा

ल्हापूर : चारचाकी वाहन व कोल्हापुरात फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद विणा संदीप रजपूत (वय २७, सध्या राहणार नारायणसिंग रामसिंग रजपूत, बॉम्बे चाळीशेजारी, लक्ष्मी एक्स्टेंशन गोकाक जि. बेळगांव) यांनी दिली.
याप्रकरणी संशयित पती संदीप बालसिंग रजपूत (वय २९), सासरे बालसिंग विठ्ठलसिंग रजपूत (दोघे राहणार साकीन धरणगुत्ती, जयसिंगपूर रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
लग्नाच्या आठ महिन्यांनंतर मार्च २०१६ पासून ते २७ सप्टेंबर २०१६ पर्यंत ताराबाई पार्क येथील यशोविद्या रेसिडेन्सी येथे विणा रजपूत हिचा चारचाकी वाहन व कोल्हापुरात फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहून आणावेत यासाठी मानसिक व छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
==========
गणेश

Web Title: Persecution of a New Wife; The crime of both with husband