शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसएफआयओची कामगिरीही खिन्न करणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 07:23 IST

गेल्या ३ वर्षांतील आर्थिक घोटाळे : गुंतल्या कंपन्या ५७६, चौकशी पूर्ण फक्त २९ प्रकरणांत

हरीश गुप्तानवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय (ईडी) १५ वर्षांत फक्त १४ जणांनाच दोषी सिद्ध करू शकले. अशीच क्षीण कामगिरी कंपन्यांतील फसवणुकीचा तपास करणारी दुसरी महत्त्वाची तपास संस्था सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसचीही (एसएफआयओ) आहे. एसएफआयओ कंपनी कामकाज मंत्रालयांतर्गत काम करते. एसएफआयओची कामगिरी खिन्न करणारी आहे. एसएफआयओ कामकाजात स्वतंत्र आहे. अटक करण्याचे आणि झडत्या घेण्याचेही अधिकार तिला आहेत. कंपन्या आणि महामंडळांनी केलेल्या गंभीर लबाड्यांना हाताळण्यासाठी सरकारने एसएफआयओची स्थापना केली आहे.

‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीनुसार एसएफआयओने २०१७-२०१८ वर्षात १३२ कंपन्यांची चौकशी केली; परंतु प्रत्यक्षात पाचच प्रकरणांत तपास पूर्ण होऊ शकला. त्याच्या पुढ्च्या वर्षीची कामगिरीही फारशी चांगली नव्हती कारण यंत्रणेने ८३ कंपन्यांची चौकशी सुरू केली. प्रत्यक्षात फक्त १२ प्रकरणांतच ती पूर्णत्वास गेली. २०१९-२०२० वर्षात ३६१ कंपन्यांची चौकशी केली गेली. प्रत्यक्षात फक्त १२ प्रकरणांना पूर्णत्व लाभले.

लोकसभेत भाजपचे दुष्यंत सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंपनी कामकाज मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, एसएफआयओकडून ९२ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. या ९२ प्रकरणांत न्यायालयांनी ज्या सहा प्रकरणांना स्थगिती दिली त्यांचा समावेश नाही. तथापि, ज्या कंपन्यांनी पैशांबाबत मोठी लबाडी केली त्या पहिल्या ५० कंपन्यांचा तपशील द्यावा या मागणीला उत्तर त्यांनी दिले नाही. ठाकूर यांनी या प्रकरणांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्या कंपन्यांनी किती रकमेची लबाडी केली हे समजेल, असे सांगून रकमेचा उल्लेख केला नाही.

...आणि पितळ उघडे पडले आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, ११८२ तक्रारी दाखल झाल्या असून, ४६२ तक्रारींचा निपटारा झाला आहे आणि ३२६ प्रकरणांत दोषसिद्धीही झाली आहे. परंतु गेल्या तीन वर्षांचा एसएफआयओच्या कामगिरीचा तपशील मिळविण्यात आल्यावर पितळ उघडे पडले. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा