पे्रयसीला जिवंत जाळले

By Admin | Updated: July 19, 2014 02:25 IST2014-07-19T02:25:11+5:302014-07-19T02:25:11+5:30

प्रियकरावर विश्वास ठेवून पती आणि मुलांना सोडून आलेल्या विवाहितेला क्षुल्लक भांडणातून प्रियकरानेच रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना गोकाकजवळील घटप्रभा येथे घडली.

Perecila was burnt alive | पे्रयसीला जिवंत जाळले

पे्रयसीला जिवंत जाळले

निपाणी (कर्नाटक) : प्रियकरावर विश्वास ठेवून पती आणि मुलांना सोडून आलेल्या विवाहितेला क्षुल्लक भांडणातून प्रियकरानेच रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना गोकाकजवळील घटप्रभा येथे घडली.
रेश्मा (३५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर सिद्धाप्पा माळप्पा चुडाप्पागोळ (३६) असे प्रियकराचे नाव आहे. रेश्माचा विवाह पामलदिनी येथील एका युवकाशी झाला होता. त्यांना तीन अपत्ये आहेत. मात्र, रेश्माचे बंडिवाड येथील सिद्धाप्पा याच्याशी संबंध होते आणि तो विवाहित होता. तरीही रेश्माला विवाहाचे आमिष दाखवून तो तिला घेऊन आला. घटप्रभा येथे एका भाड्याच्या खोलीत ते दोघे राहत होते.
केवळ महिन्याभरातच रेश्मा आणि सिद्धाप्पा यांच्यात किरकोळ कारणावरून भांडणे होऊ लागली. अशाच भांडणाच्या रागातून गुरुवारी रात्री सिद्धाप्पाने रेश्माच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यामुळे रेश्माने आरडाओरड करताच शेजारच्या नागरिकांनी तिला बेळगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते; पण रेश्मा ८५ टक्के भाजल्याने उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Perecila was burnt alive