शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकारी, व्यायसायिकांवर जनतेचा भारी राग! ५ पैकी ४ भारतीयांचे मत, इप्साेस यूकेचा सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 06:12 IST

India News: निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

 नवी दिल्ली  - निसर्गासह पर्यावरणाचे नुकसान करणारे भारतीय सरकारी अधिकारी तसेच मोठ्या व्यवसायांशी संबंधित लोकांची कृत्ये ही गंभीर गुन्हा असल्याचे घोषित करावे, असे ५ पैकी ४ भारतीयांना वाटते. एका नव्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. ‘इप्सोस यूके’ने घेतलेल्या आणि ‘अर्थ ४ ऑल’ तसेच ‘ग्लोबल कॉमन अलायन्स’द्वारा कार्यान्वित या सर्व्हेनुसार हवामान बदल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ५ पैकी ३ (६१ टक्के) भारतीयांना वाटते. निसर्गाच्या सध्या असलेल्या अवस्थेबद्दल यांतील ९० लोक चिंतित असून, या सर्वेक्षणात सहभागी ७३ टक्के लोकांना  हवामान बदलामुळे निसर्गामध्ये होणाऱ्या आकस्मिक बदलांची चिंता वाटते.

यानुसार, पृथ्वीवरील वर्षावन आणि हिमनद्यांसारख्या नैसर्गिक प्रणालींमध्ये झालेले हे बदल निसर्गाच्या संतुलनाला घातक ठरू शकतात. हे बदल पूर्वस्थितीत आणणे अत्यंत कठीण होऊ शकते, असे या लोकांना वाटते. ५७ टक्के लोकांनुसार, हवामान बदलाच्या या समस्येवर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या जीवनशैलीत फार मोठे बदल न करता उपाय शक्य आहे. तर, ५४ टक्के लोकांच्या मते पर्यावरणासंबंधी धोक्यांबाबत केले जाणारे दावे अतिशयोक्तीपूर्ण आहेत.

असे झाले सर्वेक्षणया सर्वेक्षणात जी-२०च्या १८ देशांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या देशांत अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मॅक्सिको, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन तसेच अमेरिका या देशांचा समावेश आहे. याशिवाय, जी-२० बाहेरचे ऑस्ट्रिया, डेन्मार्क, केनिया आणि स्वीडन या देशांतील नागरिकांची मतेही या सर्व्हेत जाणून घेण्यात आली. 

तापमानाने यंदामोडला विक्रमसन २०२४मध्ये जगभर उष्मा प्रचंड वाढल्याने हे वर्ष विक्रमी तापमान असलेले वर्ष ठरू शकते; कारण, या वर्षी तापमानाचे हे विक्रम मोडले ते गेल्या वर्षीच नोंदले गेले आहेत.युरोपीय हवामानशास्त्रविषयक संस्था ‘कॉपरनिकस’ने ही माहिती दिली आहे. अभ्यासकांनुसार, यंदा मानवी चुका आणि अल-निनोच्या प्रभावामुळे तापमान उच्च पातळीवर होते.विशेषत: जून महिन्यात जगाच्या बहुतांश भागांत त्या-त्या भागातील हवामानानुसार विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणIndiaभारत