शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 12:20 IST

"सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण..."

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते ट्विटरच्या माध्यमाने सातत्याने सरकारवर निशाणा साधत असतात. ते अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्यावरून सरकारला लक्ष केले आहे. ते म्हणाले, देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे आणि मोदी सरकार टॅक्स वसुली करण्याच्या नादात लागले आहे.

खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले आहे, सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण, ही महंगाई म्हणजे खरे तर मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली आहे.

संसदेचा वेळ वाया घालवू नका - तत्पूर्वी, खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मोदी सरकार विरोधकांना हेच काम करू देत नाही. संसदेचा आणखी वेळ वाया घालवू नका. महागाई, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरीवर चर्चा करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी गुरुवारी केले होते. 

“राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असे काय? की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत” -यापूर्वी, राहुल गांधींसह विरोधी पक्षातील सर्व नेते संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देत नाहीत. संसदेत जनतेला कोरोनाच्या संसर्गावर चर्चा हवी आहे. मात्र, विरोधकांना ते नकोय, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे. मोबाइलची हेरगिरी झाली असेल, तर या प्रकरणी राहुल गांधी यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे. ते का आपल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी का करत नाहीत? त्यांच्या मोबाइलमध्ये असे काय आहे, ज्यामुळे ते तपासणीसाठी घाबरत आहेत?, अशी विचारणा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

तसेच याआधी पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसTaxकर