शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण राज्याच्या दर्जासाठी जनता करणार मतदान, ३७० कलम रद्द केल्यानंतर प्रथमच होणार लोकसभा निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 10:55 IST

लडाखचा परिसर सुमारे ५९ हजार चौरस किमीचा असून त्याचा आकार दिल्ली शहराच्या चाळीसपट मोठा आहे.

लेह/कारगिल : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर लडाखमध्ये लोकसभेची प्रथमच निवडणूक होणार असून त्यासाठी २० मे रोजी मतदान होईल. आता केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला राज्याचा दर्जा द्यावा तसेच तिथे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध कराव्यात अशा प्रमुख मागण्या तेथे हाेत आहे. लडाखचा परिसर सुमारे ५९ हजार चौरस किमीचा असून त्याचा आकार दिल्ली शहराच्या चाळीसपट मोठा आहे. लडाखमध्ये लेह व कारगिल असे दोन जिल्हे आहेत. लेहमध्ये बौद्धधर्मीय व कारगिलमध्ये मुस्लिमधर्मीयांची बहुसंख्या आहे. राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीच्या अंतर्गत लडाखला संरक्षण मिळावे, या भागाला राज्याचा दर्जा द्यावा, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग तसेच लोकसभेचे दोन मतदारसंघ असावेत अशा स्थानिकांच्या मागण्या आहेत. जम्मू-काश्मीरपासून वेगळा काढून लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या निर्णयाचे लेहमध्ये स्वागत झाले तर कारगिलमध्ये लोक नाराज झाले. त्यानंतर जमिनी, नोकऱ्यांच्या प्रश्नावरून लडाखमध्ये निदर्शने सुरू झाली होती. 

उमेदवार काेण?- लडाखमध्ये भाजपने लेह ऑटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष ताशी ग्याल्सन यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले आहे. - तर त्या कौन्सिलमधील विरोधी पक्षनेते त्सेरिंग नामग्याल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कारगिलमधून मोहम्मद हनिफा हे तिसरे उमेदवार लढत देत आहेत. ते अपक्ष उमेदवार आहेत. 

‘भाजपने आश्वासने न पाळल्याचा आरोप’राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीनुसार लडाखला योग्य संरक्षण देण्यात येईल असे काँग्रेसने आश्वासन दिले आहे. हनिफा यांनी नुकतीच नॅशनल कॉन्फरन्सला सोडचिठ्ठी दिली होती. राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीनुसार द्यावयाचे संरक्षण तसेच लडाखला राज्याचा दर्जा देणे या दोन गोष्टींबाबत भाजपने मौन बाळगले आहे. 

सहाव्या अनुसूचीसंदर्भातील उपाययोजनांचे आश्वासन भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत व २०२० साली झालेल्या लेह हिल कौन्सिलच्या निवडणुकांत दिले होते. पण ते कधीही पाळले नाही असा लडाखमधील स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ladakhलडाखElectionनिवडणूक 2024