"लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील..."; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:22 IST2025-01-24T12:21:04+5:302025-01-24T12:22:48+5:30
असदुद्दीन ओवेसी हे ओखला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारासाठी आले होते......

"लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील..."; असदुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवालांवर एवढे का भडकले?
दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचा पारा सातत्याने वर-वर जाताना दिसत आहे. येथे दोन जागांवर निवडणूक लढवत असलेल्या ऑल इंडिया मजली-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी रात्री ओखला येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधला. तसेच, त्यांना ओखलाच्या रस्त्यावरून फिरण्याचे आव्हान देत, लोक त्यांच्यावर चपला फेकतील, असे म्हटले आहे.
असदुद्दीन ओवेसी हे ओखला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा-उर-रहमान यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी ओखलातील वाईट स्थितीवरून केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, आपण येथील रस्त्यांची वाईट अवस्था बघितली. अरविंद केजरीवाल यांनीही बघावी. केजरीवाल १० वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, सर्वत्र विकास होत आहे. मग येथे विकास का झाला नाही? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला.
ओवेसी पुढे म्हणाले, "आज मी येथील रस्त्यांवर फिरलो, आण १० मिनिटे चालून दाखवा. माझ्यावर फुलांचा वर्षाव झाला, येथील लोक तुमच्यावर चपलांचा वर्षाव करतील. येथे प्रचंड खड्डे आहेत, घाण आहे आणि ना साफसफाईची कोणतीही व्यवस्था आहे. १० वर्षांपासून बाजा वाजवत आहेत."
"आम आदमी पक्षाचे नेते, भाजप जिंकेल, अशी भीती लोकांन दाखवत आहेत. मात्र, ओखलातून सातत्याने अल्पसंख्याक उमेदवारच जिंकत आला आहे आणि यावेळी शिफाच विजयी होतील. ओखलाची व्होटर लिस्ट मी तुमच्या तोंडावर फेकून सांगतो की, येथून शिपच जिंकेल. तुम्ही, भाजप जिंके अशी भीती दाखवू नका. माला माहीत आहे की, तुमच्याच मनात भिती निर्माण झाली आहे," असेही ओवेसी या वेळी म्हणाले..