शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपघातानंतर रस्त्यावर तडफडत पडला असताना लोकांनी मात्र मदत करण्याऐवजी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 16:02 IST

अपघात झाल्यानंतर एक तरुण जवळपास 14 तास रस्त्यावर तडफडत पडला होता

नवी दिल्ली, दि. 18 - राजधानी दिल्लीमध्ये अपघात झाल्यानंतर एक तरुण जवळपास 14 तास रस्त्यावर तडफडत पडला होता. यावेळी एकही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी पुढे आली नाही. एक व्यक्ती पाणी पाजण्याच्या बहाण्याने त्याच्याजवळ आला, आणि 15 हजार रुपये चोरी करुन पळ काढला. प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत चोरीचा गुन्हाही नोंद केला आहे. पीडित तरुणाचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जात आहे. 

पोलीस सध्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकासोबत मदतीच्या नावे हात साफ करुन पळालेल्या व्यक्तीचाही शोध घेत आहे. जखमी तरुणाने आपल्या जबाबात चोरी झाल्याची माहिती आधी दिली नव्हती असं डीसीपी जतिन नरवाल यांनी सांगितलं आहे. गुरुवारी तपास अधिका-याऐवजी एसीपीने जबाब नोंदवण्याचं काम केलं. 

पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'जखमी तरुणाला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. तो फूटपाथवर झोपला असल्याने कोणाचं त्याच्याकडे लक्ष न गेल्याची शक्यता आहे. त्या परिसरात अनेक व्यसनी लोक फिरत असतात, त्यामुळे तेथून जाणा-या वाहनचालकांनी जखमी तरुणाला त्यांच्यातलाच एक समजलं असावं'. 

सफदरजंग रुग्णालयात नरेंद्रवर उपचार सुरु आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला काही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर ऑपरेशन करण्यात येणार आहे अशी माहिती पीडित तरुणाच्या भावाने दिली आहे. जर पोलिसांनी अपघातासाठी जबाबदार असलेल्या वाहनचालकाला पकडलं तर उपचार खर्च मिळू शकतो असंही ते बोलले आहेत. 

काय आहे प्रकरण - नरेंद्र जयपूरमधील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. 15 ऑगस्टच्या रात्री तो दिल्लीला आला होता. दिल्लीहून आपल्या उत्तर प्रदेशमधील घरी जाण्यासाठी तो काश्मीर गेटवर बस पकडण्यासाठी चालला होता. संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान रिंग रोडवर रस्ता क्रॉस करत असताना एका गाडीने त्याला धडक दिली. अपघात झाल्यानंतर कारचालक काही वेळ थांबला, मात्र नंतर पळ काढला. नरेंद्र रस्त्याच्या शेजारी पडलेला होता. मदतीसाठी याचना करत होता, मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. 

रात्री तेथून चाललेल्या एका व्यक्तीला त्याने पोलीस कंट्रोल रुमला फोन करायलाही सांगितलं. पण नंतर तो व्यक्तीही तेथून निघून गेला. शेवटी तो बेशुद्ध पडला. त्याच्याकडे 15 हजार रुपये रोख रक्कम होती. 12 हजार बॅगेत ठेवले होते, तर तीन हजार खिशात होते. रात्री एका व्यक्तीने त्यांना पाणी पाजलं होतं, त्यानेच ते पैसे चोरले होते. 

टॅग्स :AccidentअपघातCrimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली