PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:06 IST2023-02-05T16:05:31+5:302023-02-05T16:06:34+5:30

PUBG खेळता खेळता एक तरुणी प्रेमात पडली. प्रेमासाठी ती चक्क गाझियाबादहून थेट कानपूरला पोहोचली.

people were forcibly taking girl in car local people pelted stones know whole matter | PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक

PUBG साठी काय पण! गेम खेळताना प्रेम जडलं, घर सोडलं; कुटुंबीयांनी शोधताच झाली दगडफेक

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. PUBG खेळता खेळता एक तरुणी प्रेमात पडली. प्रेमासाठी ती चक्क गाझियाबादहून थेट कानपूरला पोहोचली. मुलीचे कुटुंबीय तिला घेण्यासाठी आले तेव्हा लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या दगडफेकीत काही जण जखमीही झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे. 

पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा समजले की कारमधून आलेले लोक गाझियाबादचे आहेत. त्यांची मुलगी घर सोडून गेल्यावर त्यांनी शोधाशोध सुरू केली. यावर त्यांना समजले की, PUBG गेम खेळत असताना ती तरुणी कानपूरमधील बिधानू येथील तरुणाशी बोलू लागली. यानंतर दोघेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांशी बोलू लागले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच काही न सांगता तिच्या घरातून कानपूरला आली. 

नातेवाईकांनी अधिक माहिती गोळा केली असता, कानपूरच्या हनुमंत विहार पोलीस स्टेशन हद्दीतील के ब्लॉक परिसरात एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे आढळून आले. कुटुंबीय काल रात्री कारने येथे पोहोचले, त्यांना मुलगा आणि मुलगी तेथे सापडले. त्यांनी मुलीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं पण मुलगी सोबत जायला तयार नव्हती. त्यांनी तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवले. 

रस्त्यावर घडत असलेला हा प्रकार अपहरण असल्याचं लोकांना वाटलं. त्यांनी त्यामुळे दगडफेक सुरू केली. यामध्ये अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन लोकांना शांत केलं. खूप समजावून सांगितल्यानंतर मुलीने कुटुंबियांसोबत जाण्यास होकार दिला, त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. नातेवाईकांनी पोलिसांकडे कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: people were forcibly taking girl in car local people pelted stones know whole matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.