शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

या सरकारी योजनेवर लोकांची झुंबड, ₹78000 चा मिळतोय फायदा; PM मोदींनी म्हणाले, पटापट रजिस्ट्रेशन करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 11:21 IST

ही योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आतच, 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे.

पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजनेंतर्गत आतापर्यंत तब्बल 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी नोंदणी केली आहे. या योजनेला मिळत असलेल्या या मोठ्या प्रसिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत आनंदी आहेत. पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आतच, 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे.

या राज्यांमध्ये 5 लाखहून अधिक रजिस्ट्रेशन -देशातील सर्वच भागांतून रजिस्ट्रेशन होत आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात 5 लाखहून अधिक रजिस्ट्रेशन झाल्याचे दिसून आले आहे. ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही, त्यांनी येथे http://pmsuryaghar.gov.in/ लवकरात लवकर रडिस्ट्रेश करवे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मोदी म्हणाले, या अनोख्या उपक्रमामुळे ऊर्जा उत्पादनाच्या सुनिश्चितते बरोबरच, कुटुंबांच्या विजेच्या खर्चातही लक्षणीय घट होईल. हा उपक्रम पर्यावरणपुरक जीवनशैलीला (LiFE) मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी आणि एका चांगल्या ग्रहासाठी योगदान देण्यास तयार आहे.

केंद्र सरकारकडून असे मिळेल आर्थिक सहाय्य -- 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% एवढे केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळेल. सध्याच्या प्रमाणित किंमतीनुसार,  1 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान, 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 60,000 रुपयांचे अनुदान, 3 kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल.- सर्व कुटुंबाना राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य विक्रेत्याची निवड करता येईल. हे राष्ट्रीय पोर्टल कुटुंबाना योग्य प्रणालीचे आकारमान, लाभाचा अंदाज, विक्रेत्याचे मानांकन इत्यादींविषयी समर्पक माहिती देऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहाय्य करेल.- कुटुंबांना त्यांच्या छतांवर सध्या 3 kW पर्यंतच्या सौर पॅनल सिस्टीमच्या स्थापनेसाठी  सुमारे 7% इतक्या तारण-मुक्त कमी व्याजदर असलेल्या कर्जाचा लाभ घेता येईल.

योजनेची इतर वैशिष्ट्ये -- देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात एकआदर्श सौर ग्राम विकसित केले जाईल. हे गाव ग्रामीण भाग, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांमध्ये त्यांच्या भागात छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल.- शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांना त्यांच्या क्षेत्रात छतावर सौर पॅनेल बसवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी फायदा होईल.- ही योजना नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी (RESCO) वर आधारित मॉडेल्ससाठी देयक सुरक्षिततेसाठी तसेच आर टी एस मधील नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी निधी प्रदान करते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारelectricityवीज