लोकांना चौकीदार नको रोजगार हवा, अखिलेश यांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 05:05 IST2019-03-26T05:00:01+5:302019-03-26T05:05:02+5:30
जनतेला चौकीदार नको तर रोजगार हवा आहे, असा टोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला. स्वत:ची सकारात्मक कामे जनतेला सांगण्याऐवजी भाजपाचे नेते प्रचारसभांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरच टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.

लोकांना चौकीदार नको रोजगार हवा, अखिलेश यांचा भाजपाला टोला
लखनऊ : जनतेला चौकीदार नको तर रोजगार हवा आहे, असा टोला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लगावला. स्वत:ची सकारात्मक कामे जनतेला सांगण्याऐवजी भाजपाचे नेते प्रचारसभांमध्ये फक्त विरोधी पक्षांवरच टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, लोकांनी स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या नोकऱ्या, रोजगार हवा आहे. त्यांना चौकीदार नको आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षणमित्र या योजनेखाली कंत्राटी शिक्षकांची भरती केली. त्या योजनेवरही अखिलेश यादव यांनी टीका करताना म्हटले आहे की, या देशातील बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. केंद्रामधील मोदी सरकारने बहुधा कोणतीही चांगली कामे केलेली नसावीत. त्यामुळेच आपल्या कामगिरीबद्दल न बोलता विरोधकांवर तोंडसुख घेण्यात भाजपा समाधान मानत आहे. आपला पराभव होईल अशी भीती वाटत असल्याने भाजपाचे नेते फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. मात्र हे सत्य लपविण्यासाठी भयंकर उष्म्यामुळे आम्ही फार बाहेर पडत नाही अशी कारणे भाजपा नेते देताना दिसतात.