राज्याच्या कल्याणासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवढ्या वेळा भेटावे लागेल, तेवढ्या वेळा भेटू, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. निर्मल जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना रेड्डी म्हणाले, कनेक्टिव्हिटीमध्ये अधिक सुधारणा व्हावी यासाठी, आदिलाबाद जिल्ह्यात विमानतळ मंजूर करण्याची विनंती आपण पंतप्रधानांना करणार आहोत. मला अनेक जण विचारतात की, मी नरेंद्र मोदींना वारंवार का भेजटो. ते माझे नातलग नाहीत आणि आमचे कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत, परंतु ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि विमानतळ पंतप्रधानांच्या मंजुरीनेच बांधता येईल. प्रमुख औद्योगिक संस्था येतील आणि निधी वाटप केला जाईल."
माझा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही -मुख्यमंत्रि रेवंत रेड्डी म्हणाले, "राज्याच्या विकासासाठी मी कुणालाही भेटण्यास क्षणभरही मागेपुढे पाहणार नाही. माझा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. राज्य सरकार गोदावरी नदीवरील तुम्मदिहट्टी येथे सिंचन प्रकल्प बांधण्याची योजना आखत आहे आणि या प्रकल्पासाठी शेजारच्या महाराष्ट्राचे सहकार्य आवश्यक असेल. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक त्या मंजुरी देईल, असे त्यांनी सांगितले.
"विरोधी पक्ष बीआरएसवर निशाणा साधत रेड्डी यांनी आरोप केला की, पक्षाने त्यांच्या १० वर्षांच्या राजवटीत तेलंगणासाठी काहीही केले नाही. जर ते राज्य सरकारला रचनात्मक सल्ला देऊ शकत नसतील तर दिशाभूल करणारी विधाने टाळावीत. चंद्रशेखर राव यांना दिला. येत्या महानगरपालिका निवडणुकीत सरकारसोबत जवळून काम करू शकतील अशा सक्षम उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही रेड्डी यांनी मतदारांन केले." तसेच, तेलंगणामध्ये कांग्रेस 2034 पर्यंत हारणार नाही."
Web Summary : Telangana CM Revanth Reddy stated he'll meet PM Modi for state's welfare, seeking airport approval. He dismissed personal agenda claims, prioritizing development projects with central support and Maharashtra's cooperation. He criticized BRS's inaction and urged voters to elect supportive candidates.
Web Summary : तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ने कहा कि वे राज्य के कल्याण के लिए पीएम मोदी से मिलेंगे, हवाई अड्डे की मंजूरी मांगेंगे। उन्होंने व्यक्तिगत एजेंडा के दावों को खारिज करते हुए, केंद्रीय समर्थन और महाराष्ट्र के सहयोग से विकास परियोजनाओं को प्राथमिकता दी। उन्होंने बीआरएस की निष्क्रियता की आलोचना की और मतदाताओं से सहायक उम्मीदवारों को चुनने का आग्रह किया।