शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Ghaziabad News: कोरोनानं माणूस नव्हे, नातीही संपली; ना खांदा द्यायला कुणी, अस्थिही कुणी घेईनात!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 12:13 IST

जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं.

जेव्हा ते जिवंत होते तेव्हा खांद्याला खांदा लावून जगत होते. मुलांना बोट धरुन चालायला शिकवलं, खांद्यावर बसवून खेळवलं, आपल्या जवळच्यांचा विश्वास तुटू नये म्हणून जे हवं ते सारं केलं. पण कोरोना महामारीनं हे सारं संपुष्टात आणलं. कोरोनामुळे केवळ माणसाचा श्वास नव्हे, तर नातीही संपुष्टात आली. 

ज्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालले एकत्र जगले त्यांना कोरोनानंतर कुणी खांदा देईनात. स्मशानातही माणसं जाण्यास घाबरू लागली. काही कुटुंब आपल्या घरातील सदस्यासाठी स्मशानापर्यंत पोहोचले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी परत आलेच नाहीत. 

ब्रजघाट गंगेच्या प्रवासात ४८ मृतदेह सापडले ही संपूर्ण कहाणी आहे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गंगेच्या प्रवाहात आढळलेल्या ४८ मृतदेहांची. त्यांनी गेल्या दीड महिन्यात कोरोना महामारीमुळे आपला जीव गमावला. यातील ३० जणांचं तर कुटुंबातील कोणताही सदस्य अंत्यसंस्कारासाठी परत आलाच नाही. बेवारस म्हणून त्यांची नोंद करुन अंत्यसंस्कार करावे लागले. यातील १८ जण असे होते की ज्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.

त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्य संस्कारासाठी आले पण त्यांच्या अस्थि घेण्यासाठी ते परत आलेच नाहीत. त्यामुळे प्रशासनानंच त्यांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या. मोक्ष घाटचे संचालक आचार्य मनीष पंडित यांनी सांगितलं की त्यांनी एकूण ४८ मृतदेहांच्या अस्थि गंगेत विसर्जित केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १५ एप्रिलनंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक सराकीर आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासू लागली. ऑक्सिजनचा तुटवडा आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं. 

एकवेळ तर अशी होती की रुग्ण रुग्णालयाबाहेर बेड रिकामी होईल यासाठी वाट पाहत उभा राहायचा आणि त्यातच त्याचा उपचारांअभावी मृत्यू होत होता. २१ एप्रिलपासून ते १० मेपर्यंत हिंडन मोक्ष स्थळावर परिस्थिती खूप बिकट होती. अंत्यसंस्कारासाठी रांग लागत होती. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ८ तास थांबावं लागत होतं. 

एका दिवसात एका स्मशान भूमीत तब्बल ७० ते ८० जणांवर अंत्य संस्कार केले जात होते. त्यामुळे स्थानिक नगरपालिकेनं अंत्य संस्काराची प्रक्रिया देखील स्वत:च्या हातात घेतली. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांचं विविध स्मशानभूमीमध्ये वर्गीकरण केलं जाऊ लागलं. 

सरकारी आकडे जरी मृतांची संख्या ४५० च्या जवळ असल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा हजारापर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागातील माहितीनुसार मोठ्या संख्येनं दिल्ली आणि जवळच्या जिल्ह्यांमधील कोरोना संक्रमित व्यक्तींवरील अंत्यसंस्कार हिंडन नदीच्या घाटावरच करण्यात आले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश