शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पेन, घड्याळ, मूर्ती, पुस्तके आणि बरेच काही, मोदींना वर्षभरात मिळाली एवढी महागडी गिफ्ट्स  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 10:35 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या वर्षभरातील परदेश दौऱ्यांदरम्यान अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या आहेत.

नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च पदांवर विराजमान असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या देश-विदेशातील भेटींदरम्यान विविध भेटवस्तू मिळत असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही गेल्या वर्षभरातील परदेश दौऱ्यांदरम्यान सुमारे 12.57 लाख रुपये किमतीच्या सुमारे 168 महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये फाऊंटन पेन, सेलेंगर लिमिटेड पट्टीका,  मो ब्लॉचे मनगटी घड्याळ, टी सेट, चिनीमातीची भांडी, मंदिर आणि चैत्यच्या प्रतिकृती,  विष्णू लक्ष्मी, गणपतीचे चित्र, कालीन, बुलेट ट्रेनची प्रतिकृती, छायाचित्रे, पुस्तके आदींचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2017 ते जून 2018 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेश दौऱ्यांदरम्यान 168 भेटवस्तू मिळाल्या आहेत. गेल्या वर्षभरात मोदींनी इस्राइल, जर्मनी, चीन, जॉर्डन, पॅलेस्टाइन, यूएई, रशिया, ओमान, स्वीडन, ब्रिटन, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूरसह 20 देशांचा दौरा केला होता. या परदेश भेटींमध्ये मोदींना मिळालेली सर्वात महागडी भेटवस्तू ही रॉयल सेलेंगरची लिमिटेड एडिशन असलेली पट्टीका आहे. तिची किंमत 2 लाख 15 हजार रुपये आहे. तर मोदींना मो ब्लॉ च्या मनगटी घड्याळाचाही मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये समावेश आहे. ज्याची किंमत एक लाख 10 हजार रुपये आहे. त्याशिवाय एक मशिदीची प्रतिकृती, खंजीर, म्यानासह असलेल्या दोन तलवारी, महाभारताची प्रत, योग मॅट, चांदीचा कटोरा, मुक्तीनाथ आणि पशुपतीनाथ मंदिराच्या प्रतिकृती, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शुभंकराची प्रतिकृती असलेले खेळणे, शाल, गरूड विष्णूची धातूची मूर्ती, मफलर यासारख्या भेटवस्तू मोदींना मिळाल्या आहेत. याशिवाय अन्य अनेक वस्तूही मोदींना भेटीदाखल मिळाल्या आहेत. दरम्यान, कायद्यानुसार जेव्हा भारतीय प्रतिनिधी मंडळ परदेश दौऱ्यावर जाते तेव्हा त्यांना भेटीच्या स्वरूपात मिळणाऱ्या वस्तू तीन दिवसांच्या आत संबंधित मंत्रालयात जमा करावे लागते. या वस्तूची किंमत पाच हजाराहून अधिक असेल तर त्याची किंमत निश्चित करण्यासाठी ही भेटवस्तून परराष्ट्र मंत्रालयाच्या कोषागारात पाठवली जाते. या वस्तूची किंमत पाच हजाराहून अधिक असल्याच त्या संबंधित व्यक्तीला परत दिल्या जातात. जर किंमत अधिक असेल तर अशी वस्तू कोषागारात जमा केले जाते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतnewsबातम्या