शिल्लक शेतकर्‍यांनी कारखान्याच्य्

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30

ाा योजनांमध्ये सहभाग घेऊन ऊस उत्पादन वाढवावे : विरधवल जगदाळे

Pending farmers do not have a factory | शिल्लक शेतकर्‍यांनी कारखान्याच्य्

शिल्लक शेतकर्‍यांनी कारखान्याच्य्

योजनांमध्ये सहभाग घेऊन ऊस उत्पादन वाढवावे : विरधवल जगदाळे
राजेगाव : दर एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी दौंड शुगर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन कारखान्याचे संचालक विरधवल जगदाळे यांनी केले.
दौंड शुगर कारखाना आणि झुआरी ॲग्रो केमीकल्स लि.पुणे यांचे संयुक्त विद्यमाने मलठण (ता दौंड) येथील ऊस पिक परिसंवादात ते बोलत होते. कारखान्याने झुआरी ॲग्रो केमीकल्स कंपनीच्या रासायनिक खते, ठिबक सिंचनची विद्राव्य खते इत्यादींची डिलरशिप घेतली असून सदर खतांची कारखान्याच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा समतोल वापर करून आपले ऊस उत्पादन वाढविणेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. साखर कारखानदारी अडचणीतून जात असताना कारखान्याने २000 प्रति मेट्रिक टन प्रमाणे दर दिला असून उर्वरीत रक्कम केंद्र सरकारचे पँकेज उपलब्ध झाल्यानंतर अदा करण्यात येईल. दौंड तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानदेव चव्हाण यांनी दौंड शुगर कारखान्यामुळे परिसरातील शेतकर्‍याचा आर्थिक स्तर उंचावल्याचे यावेळी नमूद केले.
आर.व्ही डावखर यांनी एकात्मक खत व्यवस्थापन, हिरवळींच्या खतांचा वापर, फेरपालट तसेच ठिबक सिंचनद्वारे द्यावयाची विद्राव्य खते अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले.
उपव्यवस्थापक किरण शेळके यांनी कंपनीच्या वतीने तीन दिवस कारखाना कार्यक्षेत्रामध्ये धडक मोहिम कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक व आभार संदेश बेनके यांनी केले.
यावेळी ज्ञानदेव चव्हाण यांची दौंड तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल विरधवल जगदाळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विरधवल जगदाळे, दौंड तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानदेव चव्हाण, संदेश बेनके, रमेश लांबे, बाळासाहेब बागल, भाऊसाहेब देवकाते, रामराव शेळके, शरद देवकाते, विठ्ठल भोसले, सुरेंद्र येवले, दादा घायाळ, भाऊसिंग परदेशी, दत्तात्रेय देवकाते, नामदेव आहेर, भाऊसाहेब कामठे, दत्तात्रेय पाचपुते, हनुमंत शेंडगे यासह मान्यवर उपस्थित होते.


------------

Web Title: Pending farmers do not have a factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.