फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:52+5:302015-08-20T22:09:52+5:30

फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

Penal action on freight passengers | फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

कट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अभियान
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गुरुवारी नागपूर ते वर्धा मार्गावर आकस्मिक तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात १३५ प्रवाशांकडून ४८ हजार १२० रुपये दंड वसूल करण्यात आला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. के. मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली आकस्मिक तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. अभियानात रेल्वेगाडी क्रमांक ५१२८६ आणि १२६१५ मध्ये नागपूर-वर्धा दरम्यान सेवाग्राम रेल्वेस्थानकावर १३५ विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आणि सहा सामानाचे बुकींग न करणाऱ्या प्रवाशांकडून ४८ हजार १२० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय घाण पसरविणाऱ्या सात प्रवाशांकडून प्रत्येकी ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय अनधिकृत सामान विकणाऱ्या १६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अभियानात सहायक वाणिज्य व्यवस्थापक, २ वाणिज्य निरीक्षक, १५ तिकीट तपासणी कर्मचारी, ५ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)
..............

Web Title: Penal action on freight passengers