Temple in Hyderabad: हैदराबादमध्ये शेकडो वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा गदारोळ झाला आहे. गुरुवारी(दि.24) रात्री स्थानिक प्रशासनाने मंदिर पाडण्याची कारवाई केली. याची माहिती मिळताच भाविकांनी मंदिरासमोर कारवाईचा तीव्र निषेध केला. यावेळी भाजप नेत्या माधवी लता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरातील बंजारा हिल्सवर सुमारे शंभर वर्षे जुने पेद्दामा मंदिर आहे. भाजप आणि स्थानिकांच्या दाव्यानुसार, हे मंदिर सुमारे शंभर वर्षे जुने आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, हे मंदिर सरकारी जमिनीवर बांधले आहे. ते पाडण्यासाठी गुरुवारी रात्री पावसात पोलिस-प्रशासन पूर्ण ताकदीने पोहोचले. स्थानिकांना याची माहिती मिळताच भाविकांची गर्दी जमली. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यादेखील घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी कारवाईची तीव्र निषेध केला आणि तिथे धरणे आंदोलन केले. यादरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले.
'माँ अम्मावरुची मूर्ती ओढून नेणे अधर्म आहे'भरपावसात भाविक मंदिर वाचवण्यासाठी आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला मंदिर न पाडण्याची विनवणीदेखील केली. या कारावाईवर माधवी लता म्हणाल्या की, हे केवळ एक मंदिर नाही, तर ती आमची श्रद्धा, आमची ओळख आणि आमची सनातन संस्कृती आहे. माँ अम्मावरूची मूर्ती जबरदस्तीने ओढणे आणि मंदिर पाडणे हा अन्याय नाही, तर अधर्म आहे.
मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने मीडिया रिपोर्समधील दाव्यानुसार, गोल्ला (यादव) समुदायाचे लोक अनेक पिढ्यांपासून पेद्दम्मा तल्लीची पूजा करतात. या कारवाईदरम्यान, गोल्ला कुटुंबांनी या कारवाईचा निषेध केला आणि म्हटले की, आम्ही जीव देऊ पण मंदिर सोडणार नाही. या घटनेमुळे हैदराबादमधील धार्मिक स्थळे आणि श्रद्धेशी संबंधित मुद्द्यांवर एक नवीन वाद सुरू झाला आहे.
देवीला फक्त नारळ पाणी अर्पण केले जातेमंदिराची स्थापत्यकला आणि धार्मिक महत्त्वामुळे लोक दूरवरून या मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. या मंदिरात भाविक नारळाऐवजी आईला फक्त नारळ पाणी अर्पण करतात. असे मानले जाते की, देवी एका राक्षसाचा वध केल्यानंतर तिची तहान भागवण्यासाठी या ठिकाणी आली होती.
मंदिराला हे नाव कसे मिळाले?या मंदिराच्या नावाची कहाणीही खूप रंजक आहे. 'पेद्दम्मा' हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे, जो पेद्द्डा आणि अम्मा यांना एकत्र करून बनवला आहे. याचा अर्थ 'मातांची आई' असा होतो. थल्ली हे आईचे प्रतीक आहे. म्हणून, पेद्दम्मा थल्लीचा अर्थही तोच आहे, जो देवीला परम मातृत्वाचे रूप दर्शवितो. पेद्दम्मा थल्लीला 'श्री गौरम्मा' आणि 'श्री अम्मावरू' असेही म्हणतात.