शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

शेतकरी आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण! पोलिसांच्या कारवाईत एकाचा मृत्यू, 25 जखमी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 18:02 IST

या आंदोलक शेतकऱ्यांनी खनौरी सीमेवर जबरदस्तीने बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला, याच वेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट उडाली अन्...

आपल्या मागण्यांना घेऊन सरकार विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर एकत्रित करत आहेत. दिल्लीकडे कूच करण्याची या शेतकऱ्यांची योजना आहे. मात्र, या दोन्ही सीमांवर पोलिसांनी या शेतकरी आंदोलकांना रोखून धरले आहे. यातच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन पुन्हा एकदा हिंसक केले आहे. 

या आंदोलक शेतकऱ्यांनी खनौरी सीमेवर जबरदस्तीने बॅरिकेडिंग हटविण्याचा प्रयत्न केला, याच वेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट उडाली. यानंतर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाटी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एवढेच नाही, तर पोलिसांनी रबरी गोळ्यांचा वापरही केला. या घटनेत 20 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. यांपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमी शेतकरी आंदोलकांपैकी दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांवर शंभू येथील तात्पुरत्या स्वरुपाच्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींपैकी तीन शेतकऱ्यांना पटियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगरूरचे सिव्हिल सर्जन डॉ कृपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला राजींद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे बंद केले आहे.

नेमकं काय आणि कसं घडलं? -मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी काही शेतकरी पंजाब आणि हरियाणा सीमेला जोडणाऱ्या खनौरी सीमेवरील बॅरिकेड्सकडे जात होते. शेतकरी बॅरिकेड्स तोडून दिल्लीच्या दिशेने कुच करण्याच्या प्रयत्नात होते. शेतकऱ्यांचे हे हिंसक आंदोलन पाहून  घटनास्थळी तैनात असलेल्या हरियाणा पोलीस कर्मचाऱ्यांनी मोर्चा सांभाळला. यावेळी त्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी रबरी बुलेट्सचाही वापर करावा लागला.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनagitationआंदोलनHaryanaहरयाणाPoliceपोलिसDeathमृत्यू