संमेलनातून शांती, बंधुभाव मजबूत
By Admin | Updated: April 4, 2015 00:15 IST2015-04-04T00:15:29+5:302015-04-04T00:15:29+5:30
संत नामदेवांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने देश आणि जगातीलही शांती

संमेलनातून शांती, बंधुभाव मजबूत
प्रतिनिधी, घुमान (संत नामदेव नगरी) :संत नामदेवांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने देश आणि जगातीलही शांती आणि बंधुभाव मजबूत होईल. विविधतेने नटलेला हा देश एका माळेत ओवला जाईल, अशी अपेक्षा पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी व्यक्त केली.
बादल म्हणाले, ‘‘पंजाबला साहित्याची मोठी परंपरा आहे. संत वाल्मिकी यांनी रामायणाची रचना येथेच केली. भगवान श्रीकृष्णांनी गीता येथेच सांगितली. आज ही दोन्ही महाकाव्य संपूर्ण देशाला एका सुत्रात ओवणारी ठरली आहेत. त्यामुळेच घुमानमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशाची शांती, एकता आणि बंधुभाव आणखी घट्ट होणार आहे. मराठीचे संमेलन येथे भरले आता पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात भरावे.