शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

मेहबुबा मुफ्ती थाटणार नवा 'संसार'; भाजपाच्या काडीमोडानंतर आता काँग्रेस होणार सत्तेतील भागीदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 12:43 IST

भाजपानं साथ सोडल्यानंतर आता पीडीपी आणि काँग्रेस सरकार स्थापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या पीडीपी सरकारचा भाजपानं पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे पीडीप सरकार कोसळून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. भाजपानं साथ सोडल्यानंतर आता पीडीपी आणि काँग्रेस सरकार स्थापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसाठी पीडीपी काँग्रेसबरोबर हात मिळवण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नियोजन समिती एक बैठकही होणार आहे. नवी दिल्लीत होणा-या काँग्रेसच्या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अंबिका सोनी, कर्ण सिंह आणि पी. चिदंबरमही सहभागी होणार आहेत. गुलाम नबी आझाद दिल्लीत नसल्यानं ते बैठकीत सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. तसेच मंगळवारी काँग्रेस आमदारांची श्रीनगरमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत पीडीपीबरोबर सरकार स्थापनेसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे.जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी 44 आमदारांची आवश्यकता आहे. पीडीपीजवळ सद्यस्थितीत 28 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 12 आमदारांचं संख्याबळ आहे. पीडीपी आणि काँग्रेस एकत्र आले तरी त्यांना 4 आमदारांची गरज लागणार आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार 3 अपक्ष आमदार आणि 1 सीपीआयएम-जेकेडीऍफचे आमदारही त्यांच्यासोबत आहेत. तेसुद्धा सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहेत. अपक्ष आमदार सरकार स्थापनेसाठी मदत करतील, असा काँग्रेसला विश्वास आहे.दरम्यान, भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा 19 जूनला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर मेहबुबा यांनी ताबडतोब राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. तिथे राज्यपालांची राजवट लागू न करण्याचा व विधानसभा विसर्जित न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. भाजपाने राज्यपालांना पत्र पाठवून सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मेहबुबा मुफ्ती यांचा निर्णय रद्द करा, अशी मागणी केली. भाजपाने आघाडी तोडल्याबद्दल मुफ्ती यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांना पीडीपीला पूर्ण काळासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. त्या म्हणाल्या होत्या की, आघाडीचा उद्देश एकतर्फी शस्त्रसंधी, पाकिस्तानशी चर्चा, 11 हजार युवकांवरील गुन्हे मागे घेणे, असा होता. पीडीपीने कलम 370चे समर्थन न्यायालयांत करून ते वाचविले. सलोखा व संवाद हा सरकारचा मुख्य उद्देश होता. शक्ती दाखविण्याचे धोरण कामाला येत नाही, असेही त्यांनी सांगितले. येथेच थांबून त्यांनी चेंडू पुन्हा मोदी सरकारच्या बाजूने ढकलला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीBJP-PDPभाजपा-पीडीपीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण