Gas Cylinder : भारीच! सिलिंडर बुकिंगवर तब्बल 1000 रुपये कॅशबॅक; जाणून घ्या 'ही' जबरदस्त ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 13:04 IST2022-05-04T13:02:47+5:302022-05-04T13:04:11+5:30
Gas Cylinder : घरगुती सिलिंडर बुकिंग करताना कॅशबॅकचा फायदा कसा मिळेल, हे जाणून घेऊया...

Gas Cylinder : भारीच! सिलिंडर बुकिंगवर तब्बल 1000 रुपये कॅशबॅक; जाणून घ्या 'ही' जबरदस्त ऑफर
नवी दिल्ली - महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळा सिलिंडर बुक केला जातो. सिलिंडर बुक करण्याची प्रोसेस प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी कॉलच्या माध्यमातून बुकिंग करतं, तर कोणी App वरून बुकिंग करतं. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर कॅशबॅकचा फायदा मिळाला तर? Paytm च्या माध्यमातून सिलिंडर बुकिंग करून 1000 रुपये कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता. Paytm वरून घरगुती सिलिंडर बुकिंग करताना कॅशबॅकचा फायदा कसा मिळेल, हे जाणून घेऊया...
Paytm वरून असा बुक करा गॅस सिलिंडर
- सर्वप्रथम Paytm अॅप ओपन करा.
- आता खासी स्क्रोल करून Book gas Cylinder चा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
- आता तुम्हाला गॅस प्रोव्हायडरची निवड करायची आहे. यामध्ये Bharatgas, HP Gas, Indane चा समावेश आहे. यापैकी तुम्ही तुमच्या प्रोव्हाइडरची निवड करू शकता.
- पुढे तुम्हाला तुमचा एलपीजी आयडी अथवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल.
- आता Proceed या पर्यायावर टॅप करा.
- आता एक पेज ओपन होईल, ज्यात खाली Apply Promocode चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला FIRSTGAS कोड टाकायचा आहे. प्रोमोकोडद्वारे तुम्हाला 50 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल.
- प्रोमोकोड टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल.
पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदाच गॅस सिलिंडर बुक करत असाल तरच कॅशबॅकचा फायदा होईल. हा प्रोमोकोड तेव्हाच लागू होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.