ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा; आता पैसे मोजावे लागणार, प्रवाशांच्या खिशावर भार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 06:12 AM2021-10-21T06:12:28+5:302021-10-21T06:13:15+5:30

कोरोनापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये प्रवाशांना बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. कोरोनाकाळात संसर्गाची भीती लक्षात घेऊन ही सुविधा बंद करण्यात आली होती.

Pay Rs 300 For Bedsheets, Pillows In AC Trains | ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा; आता पैसे मोजावे लागणार, प्रवाशांच्या खिशावर भार पडणार

ट्रेनमध्ये मोफत ब्लँकेट विसरा; आता पैसे मोजावे लागणार, प्रवाशांच्या खिशावर भार पडणार

googlenewsNext

नवी दिल्ली : राजधानी एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांत कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने चालविला आहे. 

कोरोनापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये प्रवाशांना बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. कोरोनाकाळात संसर्गाची भीती लक्षात घेऊन ही सुविधा बंद करण्यात आली होती. आपले ब्लँकेट आपणच घेऊन यावे, अशा सूचना प्रवाशांना देण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा विळखा शिथिल झाला आहे. तसेच हिवाळाही सुरू होत आहे. त्यामुळे ब्लँकेटची सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. उलट ही सुविधा कायमस्वरूपी बंद करण्याच्या पर्यायावर रेल्वे प्रशासन विचार करीत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, कोरोनाची  दुसरी लाट आता कमी झाल्यानंतर भारतीय रेल्वेने बहुतेक मार्गांवर लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. देशात सुमारे ९५ टक्के रेल्वे पुन्हा धावू लागल्या आहेत. त्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंगही मिळत आहे. प्रीमियम, मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये बेड रोलची सुविधा मात्र अजून सुरू झालेली नाही. हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन सध्या रेल्वे स्थानकांवर डिस्पोजेबल ब्लँकेट, बेडशीट, आदी वस्तूंची दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

डिस्पोजेबल बेडरोल किट आहेत तीन प्रकारचे 
पहिले किट ३०० रुपयांचे आहे.  यात प्रवाशांना ब्लँकेट, बेडशीट, उशी, उशी कव्हर, डिस्पोजेबल बॅग, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, फणी, सॅनिटायजर पाऊच, पेपरसोप आणि टिश्यूपेपर या वस्तू मिळतात.
दुसऱ्या किटची किंमत १५० रुपये आहे. यात केवळ एक ब्लँकेट दिले जाते.
तिसरे किट ३० रुपयांचे आहे. त्याला मॉर्निंग किट म्हटले जाते. यात रेल्वे प्रवाशांना टूथपेस्ट, टूथब्रश, केसांचे तेल, फणी, सॅनिटायजर पाऊच, पेपरसोप आणि टिश्यू पेपर दिला जातो.

प्रवाशांच्या खिशाला भार
सूत्रांनी सांगितले की, एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिस्पोजेबल ट्रॅव्हल बेडरोलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिल्ली विभागाने दिल्ली स्थान कावरून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल सुविधा दिली आहे. यासाठी प्रवाशांना पैसे मोजावे लागतात. 

Web Title: Pay Rs 300 For Bedsheets, Pillows In AC Trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.