पाऊसदैना - भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पुराचे 1000 बळी

By namdeo.kumbhar | Published: August 30, 2017 08:37 AM2017-08-30T08:37:04+5:302017-08-30T09:00:15+5:30

गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामध्ये आतापर्यंत 1000 हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

 Pavsana - 1000 people in India, Nepal and Bangladesh complete | पाऊसदैना - भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पुराचे 1000 बळी

पाऊसदैना - भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पुराचे 1000 बळी

Next

मुंबई, दि. 30 - दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसानं सध्या विसावा घेतला आसला तरी येणाऱ्या 24 तासांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यात आलेल्या पावसामुळे भारत, नेपाळसह दक्षिण आशियामध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामध्ये आतापर्यंत 1000 हजारपेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीनं सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यात भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये चार कोटी दहा लाख लोकांना फटका बसला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाच्या तडाख्यामध्ये अनेक जनांचा बळी गेला आहे.

संयुक्त राष्टाने भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तिन्ही देशाची परिस्थिती आणखी खरब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करावी असे त्यांनी सांगिलते आहे. ज्या ठिकाणी पुरस्थिती आहे तिथे आगामी 48 तासांमध्ये आणखी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळं पाच राज्यातील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला. पावसामुळं आलेल्या पुरानं आतापर्यंत गुजरातमध्ये 150 जणांचा बळी घेतला आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला. एकट्या पश्चिम बंगाल राज्यात वीज पडणे, भिंत कोसळण्यांच्या घटनांमध्ये 80 जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या. सुमारे दोन लाख घरे तसेच चार लाख ७२ हजार ६४५ हेक्टर शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये पावसाने हाहाकार केला होता. आहे

पुरामुळं आसाममधील 19 लाख नागरिक बाधित झाले असून 5 लाख जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कऱण्यात आलं आहे. दरम्यान पुरामुळं आसाममधील 25 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तिकडे बिहारमधीलही अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरानं बिहारमध्ये 26 जणांचा बळी घेतलाय. महानंदा नदीसह प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळं परिस्थिती चांगलीच बिकट झाली आहे. बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशालाही पावसानं चांगलाच तडाखा दिला.

नेपाळच्या सततच्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनाने आतापर्यंत 150 लोक मृत्युमुखी पडले आहेत तर ३५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. या पूराचा फटका सुमारे 60 लाख नागरिकांना बसला आहे. नेपाळच्या गृहमंत्र्यालयाच्या हवाल्याने ह्यमाय रिपब्लिकाह्ण वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या नैसर्गिक आपत्तीत २,८०० घरांचे नुकसान झाले.

बांगलादेशमध्ये पावसाने थैमान घातले असून विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनात 50 पेक्षा आधिक जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे रंगमाटी, बंदरबर्न, आणि चित्तगॉंग हे भाग पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 50 जण ठार झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस व बचाव पथके ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान येत्या ४८ तासात बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Web Title:  Pavsana - 1000 people in India, Nepal and Bangladesh complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.