'खान सर' यांच्या कोचिंग सेंटरवर जिल्हा प्रशासनाची कारवाई, टाळं ठोकत भिंतीवर चिकटवली नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:03 IST2024-07-31T18:02:06+5:302024-07-31T18:03:23+5:30
कोचिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

'खान सर' यांच्या कोचिंग सेंटरवर जिल्हा प्रशासनाची कारवाई, टाळं ठोकत भिंतीवर चिकटवली नोटीस!
बिहारची राजधानी असलेल्या पटण्यातून मोठी बातमी आली आहे. येथे जिल्हा प्रशासनाच्या चौकशी नंतर, खान जीएस कोचिंग संटर बंद करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर कोचिंग सेंटर बाहेर नोटीसह चिकटवत, आज कोचिंग बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. हा आदेश सध्या एका दिवसासाठीच आहे. जेव्हा विद्यार्थी क्लाससाठी आले तेव्हा त्यांना ही माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यासंदर्भात खान सर यांनाही नोटीस जाण्याची शक्यता आहे. खरे तर, कोचिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोचिंगमध्ये व्हेंटिलेशनसाठी पुरेशी व्यवस्था नाही. प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीही ठीक ठाक व्यवस्था नाही. आसनव्यवस्था आणि इमारत उपनियमांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जिला प्रशासनाच्या समितीने आपल्या तपासात या कमतरता समोर आणल्या आहेत. याच बरोबर बिहार कोचिंग रेग्युलेशन अॅक्टचे पालन होत नसल्याचेही म्हणण्यात येत आहे. याच बरोबर, आपण लवकरता लवकर सर्व कमतरता दूर करू आणि जिल्हा प्रशासनाच्या नोटिशीला एक-दोन दिवसांत उत्तर देऊ, असा विश्वास खान सर यांनी तपास पथकाला दिल्याचेही समोर येत आहे.
दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यापासून पाटणा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. एसडीएम श्रीकांत कुंडलिक खांडेकर टीम फोर्ससह अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटची तपासणी करत आहेत. या क्रमाने त्यांनी खान जीएस संशोधन केंद्राचीही पाहणी केली आहे.