शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लंडनमधली 'ती' लढणार बिहारची निवडणूक; स्वतःची सीएमपदाची उमेदवार म्हणून घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 08:26 IST

पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे.

ठळक मुद्देमाजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे.

पाटणाः दरभंगाचे जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. तिनं स्वतःची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली असून, बऱ्याच वर्तमान पत्रात तिनं याची जाहिरातही दिली आहे. तिनं बिहारच्या जनतेला संबोधित करत एक पत्रसुद्धा लिहिलं आहे. प्लूरल्स नावानं तयार केला राजकीय पक्षलंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरीनं प्लूरल्स (PLURALS) नावानं पक्षाची स्थापना केली असून, त्या पक्षाची ती अध्यक्ष आहे. पुष्पम प्रियानं लंडनमधल्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेजमधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या आयडीएसमधून तिनं डेव्हलपमेंट स्टडिजमध्ये एमएसुद्धा केलं आहे. पुष्पम प्रिया चौधरीनं ट्विट करत बिहारच्या जनतेला आवाहन केलं आहे की, बिहारच्या प्रगतीला वेग पाहिजे असेल तर बिहारमध्ये बदल घडलाच पाहिजे. कारण बिहारला आणखी प्रगती करण्याचा हक्क आहे. बिहारला 2020मध्ये प्रगतिपथावर नेण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी प्लूरल्स (पार्टी)शी जोडले जावा. पुष्पम प्रिया चौधरी हिनं ट्विट करत लिहिलं की, एलएसई आणि आयडीएसमधील मी केलेल्या अभ्यासानं आणि बिहारमधील माझ्या अनुभवांनी मला हे शिकवले आहे की, प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण असते. त्यामुळेच सर्वांच्या विकासाचं एकच मॉडल नसतं. पुष्पम प्रियाचे काका अजय चौधरी ऊर्फ विनय जेडीयूमध्ये आहेत. तसेच ते दरभंगा  जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पुष्पम प्रिया हिचे आजोबा दिवंगत उमाकांत चौधरी हे नितीश कुमारांचे जवळचे मित्र राहिलेले आहेत.  

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार