पंचदशनाम जुना अग्नी आखाड्याच्या पेशवाईंनी फिटले डोळ्याचे पारणे

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:13+5:302015-08-27T23:45:13+5:30

४० रथ, बँड पथक तसेच २५ चांदींच्या अंबारींमधून महंतांची शोभा यात्रा

Patience of the old pygmy fire in a five-fold; | पंचदशनाम जुना अग्नी आखाड्याच्या पेशवाईंनी फिटले डोळ्याचे पारणे

पंचदशनाम जुना अग्नी आखाड्याच्या पेशवाईंनी फिटले डोळ्याचे पारणे

रथ, बँड पथक तसेच २५ चांदींच्या अंबारींमधून महंतांची शोभा यात्रा
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिलया शाहीस्नानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना येथील पंचदशाम जुना आखाडा व अग्नी आखाड्याची डोळ्यांचे पारणे फेडणारी पशवाई आज त्र्यंबकवासीयांनी अनुभवली.
घोडागाडी, रथ, ट्रॅक्टर आदिं सजवलेल्या ४० रथांवर आखाड्याचे महंत, महामंडलेश्वर विराजमान झाले होते. प्रत्येक रथाच्या पुढे बँड, ढोलपथक, डिजे यांची सज्जता करण्यात आली होती.
प्रारंभी जुना आखाड्याची देवता दत्त भगवान यांचे चित्र असलेली भव्य मखमली ध्वजा आणि चांदण्यांची दुसरी ध्वजा, नगारा वाजविणारा मुख्य साधु पितळेच्या मोठा त्रिशुल दांडपप˜्याच्या करामती करणारे नागासाधू, सोन्याची देवता व चांदीचे देव्हारे, तुतारी वादन करीत सजवलेली बैलगाडी हे सारे अग्रभागी होते.
पेशवाईमध्ये प्रारंभी सुमेरु पिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती, गोल्डनबाबा अर्थात गोल्डन पुरी, शिवानंदगिरी महाराज, आखाड्याचे सचिव हरिगिरी महाराज, उपाध्यक्ष प्रेमगिरी महाराज साध्वी सुनितानंद गिरी, महामंडलेश्वर १००८ विश्वेरानंदगिरी चैतन्य गगनगिरी, स्वामी आनंदगिरी सहभागी झाले होते.
शोभा यात्रा आखाड्याच्या पिंपळद येथील शाखेतून जव्हार फाटा, निलपर्वत, त्र्यंबकेश्वर मंदिरामार्गे मेनरोड, कुशावर्त पाटील गल्ली मार्गे जाऊन पुन्हा पिंपळद येथील आखाड्यात त्याचा समारोप झाला.
हर हर महादेवच्या घोषणा भाविकांकडून फुलांचा वर्षाव, बँडच्या तालावर उत्साहीत होणारे साधू आणि भाविक अशा भक्तीमय वातावरणात दोन्ही आखाड्यांची शोभायात्रा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली.
हत्तीच्या आकारातला आणि हुबेहुब हत्तीचा रथही शोभायात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. जुन्या आखाड्याबरोबरच अग्नी आखाड्याचीही पेशवाई काढण्यात आली होती. या पेशवाईत प्रारंभी अग्नी आखाड्याची देवता असणार्‍या गायत्री देवीचे चित्र रेखाटलेली भव्य मखमली ध्वजा व अग्नी आखाड्याचे चांदीच्या देव्हार्‍यातून पालखी, झेंडू-गुलाबाच्या माळांनी सजवलेले रथ याचा समावेश होता. या आखाड्यातील ज्येष्ठ महंत गोपालानंद, जयदेवानंद महाराज, राष्ट्रीय महामंत्री सुदामानंद, सप्तगिरीजी महाराज, गोविंदानंग महाराज, लालबाबा आदि सर्व प्रमुख महंत उपस्थित होते. पंधरा बॅड व पंधरा सजवलेल्या रथांवर ते विराजमान झाले होते.

Web Title: Patience of the old pygmy fire in a five-fold;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.