शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पाटीदार व कपडा व्यापारी भाजपाला देणार झटका? सूरतच्या काही जागांवर फटका बसण्याची चर्चा

By संदीप प्रधान | Published: December 03, 2017 1:27 AM

पाटीदार आंदोलन, नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज कपडा व्यापारी भाजपाला सुरत शहरातील १२ जागांपैकी किमान तीन ते कमाल पाच जागांवर फटका देतील, अशी शक्यता स्थानिक नेते व कपडा व्यापारी व्यक्त करीत आहेत.

सुरत : पाटीदार आंदोलन, नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज कपडा व्यापारी भाजपाला सुरत शहरातील १२ जागांपैकी किमान तीन ते कमाल पाच जागांवर फटका देतील, अशी शक्यता स्थानिक नेते व कपडा व्यापारी व्यक्त करीत आहेत.हार्दिक पटेल प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सुरतमध्ये रोड शो करणार असून त्यानंतर वातावरण बदलेल, असा विश्वास त्या समाजाचे स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत. या समाजाने भाजपाला हिसका दिला तर कामरेज, सुरत उत्तर, वराछा रोड, करंज आणि कतारगाम या पाच मतदारसंघांत त्याचा परिणाम दिसेल. मात्र कपडा व्यापाºयांची नाराजी भाजपाला भोवली तर लिंबायत, उधना, चोर्यासी व मजूरा या चार जागांवरही भाजपाला पळता भुई थोडी होऊ शकते. गेल्या निवडणुकीत सर्व १२ जागांवर भाजपाला विजय मिळाला होता.नोटाबंदी व जीएसटीमुळे रोज चार लाख मीटर कापडाचे उत्पादन होणाºया सुरतमधील कापडाचे उत्पादन दीड लाख मीटरवर आले आहे. एक लाख लोक बेरोजगार झाले आहेत. साड्या व ड्रेस मटेरियलवरील एम्ब्रॉयडरी करणारी पाच लाख युनिट सुरतमध्ये होती. त्यापैकी दीड लाख युनिट बंद पडली. अनेकांनी आपली यंत्रे भंगारात विकली व त्यांत काम करणारे उत्तर भारतीय गावी निघून गेले. सुरतमधील १५०० कपडा मार्केटमध्ये ६५ हजार दुकाने आहेत. आता दुकान भाड्याने द्यायचे म्हटले तर भाडेकरूही मिळत नाही.सुरत विविध व्यापारी मंडळाचे व राधाकृष्ण टेक्सटाईल मार्केटचे अध्यक्ष जयलाल म्हणाले की, जीएसटीला साधारण व कपडा व्यापाºयांचा विरोध नव्हता. कपडा व्यापाºयांचे म्हणणे होते की, ज्या वस्तंूवर स्वातंत्र्यापासून कर नाही त्यावर तो लावू नका. यार्न बनवण्याच्या स्तरावर कपड्यावर कर होता त्यामुळे त्या स्तरावर जीएसटी लावा. यार्न बनवणाºया देशात केवळ ४० कंपन्या असल्याने त्या स्तरावर कर लावणे व वसुल करणे सोपे होईल. मात्र सर्वच कपडा व्यापाºयांना कर लावल्याने एक कोटीहून अधिक व्यापारी कराच्या जाळ््यात आले.याविरोधात आंदोलन केलेल्या सुरतच्या १५४ व्यापाºयांवर आजही केसेस सुरू असून पोलिसांच्या लाठीमारात ७४ वर्षांचा एक कपडा व्यापारी जबर जखमी झाला होता. कपडा मार्केट १७ दिवस बंद होती. जीएसटीमुळे ग्राहकांसाठी महागाई वाढलीच, पण छोट्या व्यापाºयांवरील वार्षिक बोजा दोन ते तीन लाखांनी वाढला. केंद्रातील भाजपा सरकार ढोंगी असल्याचे मत जयलाल यांनी व्यक्त केले. मोेदींचे गर्वहरण करण्याची वेळ आल्याचे व्यापारी बोलतात, असे जयलाल म्हणाले. त्यांचे पुत्र जगदीश म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपाला १० ते १५ जागांवर फटका बसेल. भाजपाच्या मतांची टक्केवारी घटेल.दक्षिण गुजरात चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व नामांकित उद्योजक अशोक शहा म्हणाले की, जीएसटीचा निर्णय उद्योजकांनी स्वीकारला. पण व्यापारी व मुख्यत्वे छोटे व्यापारी स्वीकारायला तयार नाहीत. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापाºयांची नाराजी याचा सुरत शहरातील दोन-तीन विधानसभा जागांवर निश्चित परिणाम होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सरकार काय करते त्यावर बरेच काही अवलंबून आहे.नव्या नोक-या सोडा, लाखो बेकार झालेकापडावरील एम्ब्रॉयडरीचे काम करणारे दीपकभाई म्हणाले की, कलाकुसर केलेल्या साड्या लग्नसमारंभानिमित्त लोक खरेदी करतात. मात्र एम्ब्रॉयडरीचे तयार कपडे व कापडाच्या किंमती वाढल्याने मागणी कमी झाली आहे. हे काम करणारे कामगार गावी निघून गेले वा त्यांनी दुसरी मोलमजुरीची कामे स्वीकारली.एम्ब्रॉयडरी करणा-या कामगारांचे नेते व कामरेज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक जीरावाला म्हणाले की, सरकार म्हणते की, ५० लाख नवे रोजगार देणार; पण गुजरातमध्ये अडीच लाख लोकांचा रोजगार नोटाबंदी व जीएसटीमुळे गेला त्याचे सरकारकडे काय उत्तर आहे?

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Gujaratगुजरात