शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Patiala Violence: पटियालात दोन समाजांमध्ये हिंसक हाणामारी, पोलिसांसमोर दिल्या खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:51 IST

Patiala Violence: पंजाबच्या पटियालामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी खलिस्तानविरोधात मोर्चा काढला होता. यादरम्यान काही शीख संघटनांनी त्यांच्यावर दगडफेक केली.

Patiala Violence:पंजाबमधीलपटियाला येथे शुक्रवारी शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हिंसक हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसेदरम्यान दगडफेक करण्यासोबत तलवारीदेखील दाखवण्यात आल्या. या घटनेत पोलिसांसह काहीजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.

पाहा Video:-

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना(बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना) कार्यकर्त्यांनी पटियाला येथे खलिस्तानविरोधात मोर्चा काढला होता. यादरम्यान, अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेकही करण्यात आली. प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांना मोठी फौज बोलवावी लागली. पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना पांगवले आणि अनेकांना ताब्यातही घेतले. 

पटियालामध्ये, शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांच्या देखरेखीखाली आर्य समाज चौकातून 'खलिस्तान मुर्दाबाद' मोर्चाला सुरुवात झाली. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. यावेळी काही शीख संघटनाही तलवारी घेऊन रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी हरीश सिंगला म्हणाले की, ''शिवसेना पंजाबचा कधीही खलिस्तान होऊ देणार नाही आणि खलिस्तानचे नाव घेऊ देणार नाही.'' 

शीख फॉर जस्टिसची घोषणा29 एप्रिल रोजी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने पंजाबमधील सर्व सरकारी इमारतींवर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर ध्वजारोहण करून व्हिडिओ पाठवणाऱ्यांना एक लाख डॉलर्सचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. गुरपतवंत पन्नूला भारतात येण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू हा शिख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे.

शीख फॉर जस्टिस म्हणजे काय?शीख फॉर जस्टिस ही खलिस्तानी संघटना आहे, तिचे मुख्यालय अमेरिकेत आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने या संस्थेला बेकायदेशीर घोषित केले होते. गुरपतवंत सिंग पन्नू अनेकदा भारतात, विशेषतः पंजाबमध्ये लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना धमकावण्यासोबतच अनेक प्रक्षोभक घोषणांमुळे पन्नू वादात सापडला आहे. पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याने प्रक्षोभक आणि देशविरोधी वक्तव्ये केली आहेत.

टॅग्स :Punjabपंजाबpatiala-pcपटियालाPoliceपोलिसBhagwant Mannभगवंत मान