शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Patiala Violence: पटियाला हिंसाचारानंतर शहरात इंटरनेट बंद; IG, SSP आणि SP हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 11:50 IST

Patiala Violence: पटियालामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Patiala Violence: पटियाला येथे शुक्रवारी खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पतियालामध्ये रात्री साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. अफवा पसरू नयेत यासाठी पंजाब सरकारच्या गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. तसेच, पटियालाचे IG राकेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ एसपी आणि शहर एसपी यांनाही हटवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुखविंदर सिंग चिन्ना यांची पटियालाचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, दीपक पारिक यांची वरिष्ठ एसपी आणि वजीर सिंग यांची एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शहरात पोलिसांच्या 10 कंपन्या तैनात करण्यात आल्या असून पोलीस फ्लॅग मार्च काढत आहेत.

हिंदू संघटनांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी या घटनेवर आज हिंदू संघटनांनी पटियाला प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत या घटनेत थेट सहभागी असलेल्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे हिंदू संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. हिंदू संघटनांनी आज पटियाला बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे हिंदू संघटनेच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. 

हिंसाचारात दोन पोलिसांसह चार जण जखमीपटियाला येथील चकमकीच्या या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) नानक सिंग यांनी सांगितले की, खलिस्तानविरोधी मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. चकमकीदरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लोकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. 

काय आहे संपूर्ण प्रकरणशुक्रवार(दि.29) शिवसेनेचे कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांनी खलिस्तान मुर्दाबाद मार्चची घोषणा केली होती. शिवसेना पंजाबला खलिस्तान होऊ देणार नाही, असे ते म्हणाले होते. सिंगला यांच्या घोषणेनुसार शुक्रवारी ठरलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमले आणि खलिस्तान मुर्दाबादचा मोर्चा निघाला. यावेळी खलिस्तान समर्थक तिथे आले आणि दगडफेक सुरू केली. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यावेळी अनेकांनी तलवारीदखील उगारल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानPoliceपोलिस